ETV Bharat / state

वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून आवळल्या मुसक्या - Vanraj Andekar Murder Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 9:55 PM IST

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताम्हिणी घाटात लपून बसलेल्या 13 जणांनी अटक केली. या 13 जणांनी आंदेकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. यात काही अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे.

Vanraj Andekar Murder Case
वनराज आंदेकर खून प्रकरण (Source - ETV Bharat)

पुणे Vanraj Andekar Murder Case : पुण्यातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार आणि चाकूनं वार करून हत्या केली. हा हल्ला कोणी केला? का केला? याचा तपास पोलीस करत असतानाच या हल्ल्यामागं वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेव्हणा असल्याचं समोर आलं. आता याप्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांना अटक केली.

ताम्हिणी घाटातून 13 जणांना अटक : माजी नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेव्हण्याला अटक केली. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी या प्रकरणात ताम्हिणी घाटातून आता 13 जणांना अटक केलीय. वनराज आंदेकर यांची गोळीबार करून हत्या केलेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात तळ ठोकला होता. पोलिसांनी सापळा रचत ताम्हिणी घाटात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अल्पवयीन तरुणांचा समावेश : पुणे पोलिसांनी काल जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, संजीवनी जयंत कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली. या प्रकरणी गणेश लक्ष्मण कोमकर, सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आत्ता या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली, असून यात काही अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे.

गुन्हेगारीमुळं चर्चेत : पुण्यातील या घटनेमुळं गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत सुरू आहे. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता गुन्हेगारीमुळं पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

हेही वाचा

  1. कुणी रस्ता देता का रस्ता! रस्ता नसल्यानं चक्क बैलगाडीतून न्यावा लागला मृतदेह; स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही दयनीय स्थिती - Chhatrapati Sambhajinagar Road
  2. बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक आयुष हरपला; वाचा नेमकं काय घडलं - Thane Crime News
  3. इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai crime

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.