ETV Bharat / state

Pune Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; पतीनं पत्नीला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pune Crime News : दारुसाठी पैसे न दिल्यानं संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीला संपवलं असल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

Pune Crime News husband killed his wife for not given money for liquor in Pimpri Chinchwad
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; पतीनं पत्नीला संपवले; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 7:55 PM IST

पिंपरी चिंचवड Pune Crime News : दारूच्या व्यसनामुळं अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं हल्ली बघायला मिळतं. आर्थिक चणचणीपासून ते कुटुंबाची ससेहोलपट दारूमुळं होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणानं एकानं आपल्या पत्नीला संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे घडली असून घटनेनंतर आरोपी पती फरार आहे.

लोखंडी रॉड डोक्यात मारून केली हत्या : दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड डोक्यावर मारून पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना मोशी येथील शिवाजी वाडी भागातील सिल्व्हर करिष्मा बिल्डींग समोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार सदरील घटना रविवारी (10 मार्च) साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. जयश्री मारुती बाबान्ना (वय-47) असं मृत महिलेचं नाव असून या घटनेसंदर्भात त्यांचा मुलगा बालाजी मारुती बाबान्ना (वय-29) यानं एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन आरोपी मारुती चंद्राप्पा बाबान्ना (वय 50) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी फरार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती बाबान्ना हा मोठ्या प्रमाणात व्यसन करायचा. त्यामुळं या कारणावरुन त्याचे त्याच्या पत्नीशी सतत वाद व्हायचे. रविवारी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी रागाच्या भरात आरोपीनं आपल्या पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला. रॉडचा मार इतका जोरात होता की तिथेच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीनं लगेच घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना झालं असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पठारे करत आहेत.

हेही वाचा -

  1. मामीच्या सौंदर्यावर भाळला भाचा; शरीरसुखाची मागणी, नकार अन् थेट खून
  2. मुंबईत बालकांचे 'विकृत शिकारी'; वडाळ्यात बालकाचं धड अन् शिर आढळल्यानं खळबळ, बंगालचा संशयित पळाला
  3. लिव्ह इन पार्टनरचा खून करुन तरुणानं स्वतःचा चिरला गळा : आठ वर्षापासून होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.