ETV Bharat / state

सीएनजी पंपावर गॅसचे ‘नोझल’ उडाल्यानं कर्मचाऱ्यांनी गमावला डोळा; पाहा धक्कादायक व्हिडिओ - PUNE CNG PUMP ACCIDENT

पुण्यात दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागल्याची घटना तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली.

Pune CNG Pump Accident
गणेश गेहलोत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 6:26 PM IST

Updated : Dec 17, 2024, 10:20 PM IST

पुणे : शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर अनेक रिक्षाचालक, चारचाकी आणि दुचाकी सीएनजी भरताना दिसतात. परंतु, या सीएनजी पंपावर पेट्रोल भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे, सीएनजी भरत असताना किती लांब थांबलं पाहिजे. याबाबत अनेकांना कल्पना देखील नसते. जर आपण काळजी घेतली नाही, तर याचे वाईट परिणाम देखील होतात, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पुण्यात दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला. ही घटना तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर दोन महिन्या पूर्वी घडली. या प्रकरणी पेट्रोल पंप मालक धैर्यशील पानसरे, राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हर्षद गणेश गेहलोत या कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला. मालकाकडून मदत न मिळाल्यानं पोलिसात तक्रार दिली. पण घरची परिस्थिती अतिशय वाईट असल्यानं मदतीची अपेक्षा हर्षदनं केली आहे.

प्रतिक्रिया देताना पंप मालक धैर्यशील पानसरे (ETV Bharat Reporter)

मला न्याय कधी मिळणार? : हर्षद हा गेल्या एक वर्षापासून एस स्वेअर सीएनजी पंपावर काम करत होता. त्याच्यामते जेव्हा तो कामाला लागला तेव्हा सेफ्टी बाबत काहीच सांगण्यात आलं नव्हतं. तीन चार महिन्यानंतर हर्षदनं पंपाच्या मालकांना म्हटलं होतं की, सेफ्टीसाठी आमचं इन्शुरन्स काढून द्या. मात्र या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं. जेव्हा एमएन जीएलचे लोक पाहणी करण्यासाठी आले तेव्हा फक्त सेफ्टी शूज घालून येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसारच आमचं काम हे सुरू होतं. दोन महिन्यापूर्वी सायंकाळी एका दुचाकीमध्ये मी गॅस भरत होतो. यावेळी अचानक गॅसचे नोझल तोंडावर उडाले. यामध्ये डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि डोळा गमवावा लागला. असं असताना आता मालकाकडून मला कोणतीही मदत न मिळाल्यानं मी पोलीसात तक्रार दिली आहे. परंतु मला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा हर्षद यांनी व्यक्त केली आहे.

आज माझ्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. माझ्या २३ वर्षाच्या मुलाला अशी दुखापत झाल्यानं घर कसं चालणार ? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. - हर्षदची आई

आम्हाला शक्य आहे तेवढी मदत केली आहे. त्याचवेळी प्रशिक्षणावेळी दिलेल्या ट्रेनिंगची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा आहे.- धैर्यशील पानसरे, पंप मालक

सूचनांचे पालन व्हावे : पुण्यातील या घटनेत 23 वर्षीय हर्षदला एक डोळा गमवावा लागला. आता तो न्यायासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहे. मात्र सीएनजी पंपावर ज्या काही सेफ्टीच्या संदर्भात सूचना दिल्या गेलेल्या असतात, त्याचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे.

हेही वाचा -

  1. Cng latest Price : सीएनजी 95 पैशांनी महाग, जाणून घ्या आजपासून दिल्लीत कितीला मिळणार सीएनजी ?
  2. Rickshaw Thief Arrested : 3 रिक्षांसह मास्टर की रिक्षा चोराला एमएचबी पोलिसांनी केली अटक
  3. Big changes in november 2023 : आजपासून होत आहेत मोठे बदल; जाणून घ्या काय होईल परिणाम

Last Updated : Dec 17, 2024, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.