ETV Bharat / state

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद - अजित पवार - Majhi Ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पुण्यात झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत निधीची सविस्तर माहिती दिली.

Ajit Pawar
अजित पवार (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 9:25 PM IST

पुणे Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जुलैपासून या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीला उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शरद पवार यांच्यासह आमदार, अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 29 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले, त्यांना जुलैपासून लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी दरमहा सुमारे 3 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेऊ शकणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना शहरी, ग्रामीण भागात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

27 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन : "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात 27 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, त्यामुळं भविष्यात चांगला रोजगार मिळू शकेल. अनेक उद्योगांनी या योजनेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून प्रशिक्षणार्थींनी चांगली कामगिरी केल्यास कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल. ही योजना तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे".

प्रदूषणाबाबत चर्चा : जिल्ह्यातील नद्या, धरणांमधील प्रदूषणावर चर्चा होणार आहे. एमआयडीसी परिसरातील प्रदूषणाबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. पवना धरण परिसरातील रिसॉर्टमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत नोटिसा बजावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. साखर कारखान्याकडून अशुद्ध पाणी नदीत सोडलं जाणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, त्यासाठी कारखान्यांच्या प्रतिनिधींशी चर्चाही केली जाणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करावं, असे आवाहन पवारांनी केलं.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना : शहरी, ग्रामीण भागात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, ड्रोनविरोधी उपाययोजनांसाठी पोलिसांनी नाविन्यपूर्ण उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करावेत. पीएमआरडीएनं खडकवासला धरण परिसरातील सांडपाणी, कचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात. क्रीडा साहित्य खरेदी करताना ते दर्जेदार असल्याची खात्री करा. कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट्स घेण्यात याव्यात, असं निर्देशही अजित पवारांनी दिले.

'हे' वाचलंत का :

  1. दादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा; अजित पवार म्हणाले "मी माझ्या पैश्याचं घालतो..." - Ajit Pawar Pune Visit
  2. काँग्रेस फुटीर आमदारांवर खरंच कारवाई करणार की फक्त फार्स? - Congress MLA Cross Voting
  3. 'सुपरमॅन'च्या पायाखालची बहुमताची सतरंजी 'कॉमनमॅन'नं खेचली; संजय राऊतांचा भाजपला टोला - Sanjay Raut On BJP

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.