ETV Bharat / state

Stone Pelting : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज - Pandhari Khanapur village entrance

Stone Pelting In Amaravati : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर चार दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या जमावानं विभागीय आयुक्तालयावर आज (11 मार्च) तुफान दगडफेक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अखेर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

Stone Pelting In Amaravati
संतप्त जमाव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 7:14 PM IST

Updated : Mar 11, 2024, 8:21 PM IST

पोलिसांवर दगडफेक करताना आंदोलक

अमरावती Stone Pelting In Amaravati : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात येणाऱ्या पांढरी खानापूर या गावात प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी करण्यासाठी गत दहा दिवसांपासून ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी पांढरी खानापूर येथील ग्रामस्थ आपलं गाव सोडून अमरावती शहरात दाखल झाले. दरम्यान गावातील प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीनं सर्व बाजूंनी विचार केला जात होता. आज पांढरी खानापूर येथील ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून मोठा जमाव विभागीय आयुक्तालयावर धडकला.

जमावाचा पोलिसांवर हल्ला : अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिसांच्यावतीनं दिवसभर या जमावाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास जमावानं विभागीय आयुक्तालयावर प्रचंड प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावानं पोलिसांवर देखील हल्ला चढवला.

विभागीय आयुक्तालय परिसरात दहशत : विभागीय आयुक्तालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांच्यावतीनं जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्यानं याचा धूर विभागीय आयुक्तालय परिसरात पसरला आहे. विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपापल्या दालनात स्वत:ला कोंडून घेतलं आहे.

रस्त्यावर दगडांचा खच : या दगडफेकी दरम्यान पोलिसांच्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तालया बाहेर उभे असणाऱ्या पोलिसांच्या जवळपास सर्वच गाड्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी बाहेर उभ्या असणाऱ्या सर्वच गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयाच्या परिसरातील दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर विभागीय आयुक्तांना समोर मुख्य मार्गावर दगडांचा खच लागला होता.

अग्निशामक दलाच्या वाहनावर दगडफेक : हजारोच्या संख्येत मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकल्यामुळे विभागीय आयुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. दरम्यान आंदोलकांनी विभागीय आयुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लाठीचार्ज करीत प्रवेशद्वारासमोरील गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला असता विभागीय आयुक्तालय बाहेरची गर्दी आतमध्ये आली आणि त्या गर्दीवर पाण्याचा मारा करण्यासाठी उभ्या असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनावर या जमावाने तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत अग्निशमन विभागाच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले.

रुग्णवाहिका आल्या धावून : घटनेनंतर अनेक रुग्णवाहिका विभागीय आयुक्तालय परिसरात धावून आल्या. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी जखमी पोलिसांची तपासणी केली. तसेच गंभीर जखमी असणाऱ्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

विभागीय आयुक्तांनी केली पाहणी : विभागीय आयुक्तालया बाहेर झालेल्या प्रचंड राड्यानंतर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्वतः आपल्या दालना बाहेर येऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी अमरावती शहरासह जिल्ह्यात कुठेही चुकीची घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश देखील त्यांनी पोलिसांना यावेळी दिले.

हेही वाचा :

  1. Loksabha Election 2024 : पतीला निवडून आणणारी पत्नीचं असणार विरोधी उमेदवार, दोघांचाही विजयाचा दावा
  2. इलेक्टोरल बाँड योजनेत एसबीआयला मोठा धक्का, उद्यापर्यंत माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
  3. छत्रपती संभाजी महाराजांची तारखेनुसार पुण्यतिथी, जाणून घ्या 'स्वराज्यरक्षकां'बद्दल महत्त्वाच्या गोष्टी...

Last Updated : Mar 11, 2024, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.