ETV Bharat / state

दुखणं पायाचं आणि शस्त्रक्रिया गुप्तांगाला; शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरकडून धक्कादायक प्रकार? - surgery on genital - SURGERY ON GENITAL

Shahapur District Hospital : वैद्यकीय निष्काळजीपणाची धक्कादायक घटना शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरकडून घडली आहे, असा आरोप पालकांनी केलाय. मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्याऐवजी त्याच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया (Genital Surgery) करण्यात आली आहे. याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Shahapur District Hospital
शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालय (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 7:45 PM IST

Updated : Jun 25, 2024, 7:58 PM IST

ठाणे Shahapur District Hospital : शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरकडून धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका १४ वर्षाच्या मुलाचं दुखणं पायाचं होतं. मात्र येथील डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगावरच शस्त्रक्रिया (Genital Surgery) करून त्याला गंभीर दुखापत केल्याचा आरोप पालकांनी केलाय. शहापूर तालुक्यातील सावरोलीच्या 14 वर्षीय मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.

प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय अधिकारी (ETV BHARAT Reporter)

मुलाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया : मुलाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या तळपायाला जखम झाली होती. त्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी उपचारासाठी त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर त्याच्या पायाचे एक्स-रे काढण्यात आले. सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा आई-वडिलांना सांगितलं की, मुलाच्या पायाचं ऑपरेशन करावं लागेल. दुसऱ्या दिवशी त्याच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात या मुलाचं ऑपरेशन करण्याअगोदर दोन मुलांच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर या मुलाला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्याही गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांचा निष्काळजीपणा? : ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि तेथे त्याच्या आईनं त्याला बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, आपल्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र, पायाचं ऑपरेशन केलंच नसून त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन केलं आहे. तर दुसरीकडं त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन का केलं? असा प्रश्न पालकांनी विचारला. मुलाच्या आईनं हॉस्पिटलमध्ये आरडा ओरड केल्यानंतर डॉक्टरांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि जखम झालेल्या डाव्या पायाचं ऑपरेशन केलं. एकंदरीतच शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचं या प्रकरणावरुन झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

माझ्या मुलाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळं त्याला आम्ही रुग्णालयात दाखल केलं होतं, डॉक्टरांनी त्याच्या पायाचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला ऑपरेशनसाठी घेऊन गेलो आणि ऑपरेशन करून आल्यावर माझ्या लक्षात आलं की, त्याच्या तर पायाचं ऑपरेशनच केलं नाही. गुप्तांगाचं ऑपरेशन केलं आहे. मी दवाखान्यात आरडाओरड केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन थियेटरमध्ये नेलं आणि त्याच्या पायाचं ऑपरेशन केलं. - रुग्णाची आई

मुलाला दोन प्रॉब्लेम होते म्हणून त्याची दोन्ही ऑपरेशन एकाचवेळी केली. ऑपरेशनच्यावेळी पेशंटच्यासोबत असलेले काही नातेवाईक बदलतात म्हणून त्यांना सांगितलं होतं.परंतु, त्यांचे नातेवाईक बदलले असावे. - डी. आर. शिंदे वैद्यकीय अधिकारी शहापूर उपजिल्हा रुग्णालय

सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली दखल : मुलाच्या आई-वडिलांना डॉक्टरांनी कोणतीही पूर्व सूचना न देता गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं. तर मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवत त्यांच्या मुलाचं चुकीचं ऑपरेशन केलं आहे. जोपर्यंत त्याची पुढील जबाबदारी डॉक्टर घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणार नाही.

हेही वाचा -

  1. देवाने डोळे दिले पण नजर दिली डॉक्टरांनी; दोन वर्षांच्या मुलीवर झाली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  2. वैद्यकीय चमत्कार! पहिलं बाळ गर्भात दगावल्यानंतर दुसऱ्या बाळाची १२५ दिवसांनी प्रसूती

Last Updated : Jun 25, 2024, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.