ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा यांनी केला आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 9:26 PM IST

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया (Reporter Maharashtra Desk)

छत्रपती संभाजीनगर Prakash Ambedkar : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना गरज पडल्यास सर्वप्रथम मी पुढे येईल, असं विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं असून उद्धव ठाकरे मुस्लिम मत मिळवण्यासाठी कॉंग्रेसबरोबर गेले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. निवडणूक झाली की उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच कोल्हापूरची गादी वैचारिक असल्यानं पाठिंबा दिला, मात्र सातारा येथील गादी महाराजांशी संबंधित आहे, मात्र ते राजकीय असून भाजपासोबत आहेत. त्यांनीच गादीचा अवमान केलाय, त्यामुळं त्यांना पाठिंबा दिला नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

ठाकरे भाजपासोबत जातील : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार धर्मवादी राहीले नसून धर्मनिरपेक्ष झाले आहेत. रश्मी ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली होती. कल्याण येथे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटानं कुमकुवत उमेदवार दिला. त्यामुळंच उद्याच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट भाजपा एकत्र येऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुस्लिमांनी ठाकरे गटापासून सावध रहावं, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला. कॉंग्रेस, एमआयएम, ठाकरे गट यांना मुस्लिमांच्या मतांची गरज आहे. त्यामुळं त्यांचा हा एककलमी कार्यक्रम असल्याचाही आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. युवकांमध्ये सरकार विरोधी नैराश्य पसरलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील वंचितचं उमेदवार देवगन यांच्या प्रचारासभेसाठी प्रकाश आंबेडकर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूरच्या गादीला पाठिंबा : कोल्हापूरच्या गादीला पाठींबा दिला कारण आमची वैचारीक बैठक आहे. शरद पवार यांनी मागे शाहू महाराजांचा पराभव केला होता, त्यामुळंच आम्ही शाहू महाराजांना पाठींबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, मात्र सातारा गादी सांभाळणारे राजकारणात आहे. ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक वैदीक पद्धतीनं करायला विरोध केला, त्यांचं लोकांबरोबर सातारा गादीचे वंशज राजकारण करत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आता वंचितसोबत नाही : वंचित बहुजन आघाडीला काही ठिकाणी एमआयएम पक्षानं पाठींबा दिला, मात्र आम्ही तो मागितला नाही. 2019 च्या निवडणूकीत त्यांच्यामुळं आमचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्यासोबतची आघाडी मोडली. त्यामुळं त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही, अस त्यांनी सांगितलं. प्रचारात मुद्दे नसुन खालच्या स्तरावर प्रचार सुरु आहे. 14 लाख भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक झाले. यावर मोदी शाह बोलत नाही, विरोधी पक्षही बोलत नाही, ही शोकांतिका ‌असल्याची खंत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यात दुष्काळ, मात्र प्रचारात नाही : मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय, शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र, प्रचारातून हे मुद्दे कोणीच मांडत नाही. यावर बोलताना मराठवाड्यातील जनतेलाच हे प्रश्न सोडवायचे नाही, असा माझा आरोप आहे. मागील निवडणुकीत दुष्काळ प्रश्न सोडवण्यासाठी मी आराखडा मांडला. मात्र जनतेने तो नाकारला असंही आंबेडकरांनी माध्यमांना सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. मराठी भाषा येत नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारला उमेदवारी अर्ज; काय घडलं नेमकं? - Lok Sabha Election 2024
  2. "ज्यांच्या पाया पडून तुम्ही मुख्यमंत्री झालात..."; अमित शाहांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवार अन् काँग्रेसवर हल्लाबोल - Amit Shah Sabha in Maharashtra
  3. राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरताच भाजपाच्या नेत्यांचा निशाणा, म्हणाले... - Rahul Gandhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.