ETV Bharat / state

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र असल्याचा पूनम महाजन यांचा दावा, कोणावर निशाणा? - PRAMOD MAHAJAN MURDER CASE

माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र होते, असा दावा त्यांच्या कन्या तथा माजी खासदार पूनम महाजन यांनी केला. त्या एका माध्यमांशी बोलत होत्या.

Poonam Mahajan news
पुनम महाजन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 1:57 PM IST

Updated : Nov 7, 2024, 2:03 PM IST

मुंबई - माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. प्रमोद महाजन यांची हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष भावनेपोटी नव्हती, असा दावा केला. ते एक मोठं षडयंत्र होतं, असा दावा एका माध्यमांशी बोलताना केला.

माजी खासदार पूनम महाजन यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पूनम महाजन यांनी म्हटलं, "माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याचं चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होते. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आले. एवढेच नाहीतर माझे लोकसभेच्या वेळी तिकीटही कापण्यात आलं. तेही एक मोठं षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? हे असं कोणी का केलं? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल." मी माझ्या कामाला प्राधान्य देते असेही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

म्हणावी तशी चौकशी झाली नाही... दुसरीकडे पूनम महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे यावर बोलताना म्हणाले," पूनम महाजन यात षडयंत्र होतं असं म्हणत असतील तर, चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी मी स्वतः प्रमोद महाजन यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळीही त्यांची हत्या कौटुंबिक वादातून झाली, अशी मोठी चर्चा होती. त्यावेळी चौकशी झाली. पण चौकशीतून काही बाहेर आले नाही. तसेच म्हणावी तशी चौकशी झाली नाही. पण आता जर पूनम महाजन यांनी हा दावा केला असेल तर सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी," असं एकनाथ खडसे म्हणाले आहे. "प्रमोद महाजन हे आमच्यासाठी मोठे मार्गदर्शक होते. त्यांची हत्या झाल्यानंतर आम्हाला धक्का बसला होता. त्या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलो नाही," अशी एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुरावे सादर करावे... पूनम महाजन यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. "जर त्यांच्याकडे काही पुरावे किंवा तसे कागदपत्र असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावे. सरकार त्याची नक्कीच चौकशी करेल. याच्यात कोण जर दोषी असेल तर त्याच्याही कारवाई करण्यात येईल, असे मुनंगटीवार यांनी म्हटलं आहे.

  • पूनम महाजन यांच्या खळबळजनक दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अठरा वर्षानंतर प्रमोद महाजन यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत चर्चा सुरू झाली.

Last Updated : Nov 7, 2024, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.