ETV Bharat / state

कारमधून पोलिसांनी जप्त केले 5 कोटी; संजय राऊत म्हणाले 'काय बापू काय झाडी काय डोंगर' - ASSEMBLY ELECTION 2024

नाका बंदी दरम्यान साताऱ्याकडं जाणाऱ्या एका कारमधून पुणे पोलिसांनी तब्बल 5 कोटी रुपयाची रोकड पकडली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2024, 7:09 AM IST

Updated : Oct 22, 2024, 8:15 AM IST

पुणे : नाकाबंदीत पुणे ग्रामीण पोलिसांनी एका कारमधून तब्बल 5 कोटी रुपयाची रोख जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना खेड शिवापूर टोल नाक्यावर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. मात्र उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. संजय राऊत यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर करत " काय बापू, काय झाडी काय डोंगर" असा निशाना साधत "मिंधे यांनी प्रत्येक आमदाराला 75 कोटी रुपये पाठवले असून 15 कोटीचा हा पहिला हप्ता" असं नमूद केलं आहे. त्यामुळे मोठं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ASSEMBLY ELECTION 2024
खासदार संजय राऊत यांनी केलेलं ट्विट (ETV Bharat)

खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटींची रोकड पकडली : आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. पुणे ग्रमीण पोलिसांनी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर बंदोबस्त लावला आहे. सोमवारी रात्री बंदोबस्तात तपासणी करताना साताऱ्याकडं जाणाऱ्या एका कारमध्ये चार जण बसलेले होते. या कारची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात तब्बल 5 कोटीची बेहिशोबी रोकड आढळून आली. यावेळी पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेत त्या चार जणांची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस आणि निवडणूक अधिकारी करत आहेत पैशांची मोजणी : साताऱ्याकडं जाणाऱ्या कारमधील चार जणांकडून पोलिसांनी तब्बल 5 कोटी रुपयाची बेहिशोबी रोख ताब्यात घेतली आहे. या कारवाईनंतर पोलीस आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या पैशांची मोजणी करत आहेत. या चार जणांकडं रोख रक्कम कुठून आली ? या रोख रकमेचा स्त्रोत काय ?, आदी बाबीचां तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

संजय राऊत म्हणाले 'काय झाडी काय डोंगर' : कारमध्ये 5 कोटी रुपयाची रक्कम आढळून आल्यानंतर उबाठा गटाचे नेते कासदार संजय राऊत यांनी सोशल माध्यमात एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी,

"मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!

हे आमदार कोण?

काय झाडी…

काय डोंगर….

मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले

१५ कोटी चा हा पहिला हप्ता!

काय बापू..

किती हे खोके?" असं नमूद केलं आहे.

हेही वाचा :

  1. पुण्याहून कोल्हापूरला जाताना कारमधून रक्कम लुटल्याचा बनाव, सीआयडी हवालदारासह कार चालकच निघाला आरोपी
  2. सराफा व्यावसायिकानं घरामध्ये 'या' ठिकाणी लपविलं, ३० तासांनी अखेर आयकर अधिकाऱ्यांनी जप्त केले २६ कोटी! - Nashik Income Tax Raid
  3. 1 कोटी रोख, सोन्याची बिस्किटं आणि बरंच काही; मल्टीस्टेट घोटाळ्यात लाच स्वीकारणाऱ्या पीआयकडं कोट्यावधी रुपयांचं घबाड - Beed Crime
Last Updated : Oct 22, 2024, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.