ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी 3 संशयितांना घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case - SALMAN KHAN FIRING CASE

Salman Khan Firing Case : बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या गॅलक्सी या अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Salman Khan Firing Case
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 9:38 AM IST

Updated : Apr 15, 2024, 2:02 PM IST

मुंबई Salman Khan Firing Case : बॉलीवूडमधील भाईजान अशी ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील बांद्रा इथल्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बांद्रा पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेतील तीन सशंयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गोळीबाराची गंभीर दखल पोलिसांसह राज्य सरकारनं देखील घेतली आहे. रविवारपासून मुंबईत ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या सीमेबाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आता दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचं देखील लक्ष असणार आहे.

तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : या गोळीबारानंतर काही तासातच रविवारी या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्विकाल्याची आहे. अनमोल बिश्नोई यानं फेसबुक पोस्टवरुन या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकी बांद्रा येथील एका चर्चच्या बाहेरुन पोलिसांनी जप्त केल्या. या गोळाबारात वापरलेली दुचाकी मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून मिळाली आहे. जप्त केलेल्या दुचाकीचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. यासह सलमान खानच्या घरात एक गोळी सापडली असून त्याचाही तपास सुरू आहे. आरोपी महाराष्ट्रबाहेरुन आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबारानंतर आरोपी पश्चिम द्रुतगती मार्गानं दहिसरच्या दिशेनं निघालं होते. पळून जाताना आरोपींनी स्थानिक लोकांना एक्स्प्रेस वेचा रस्ता विचारल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याचा तपास केला असता, तीन सशंयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गोळीबारानंतर पोलिसांच्या 15 ते 20 टीम या आरोपींच्या मागावर होत्या. तिन्ही संशयितांची सध्या चौकशी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सोशल माध्यमांवर पोस्टकरुन सलमानला धमकी : गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या घराची सुरक्षा आणखी वाढवली आहे. राज्य सरकारकडून देखील अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी बिश्नोई गँगनं स्विकाली आहे. अनमोल बिश्नोई यानं फेसबुक पोस्टवरुन या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. पोस्टमध्ये "सलमान खान आम्ही तुला हा फक्त एक ट्रेलर दाखवला आहे..., तुला आमची ताकद समजेल... बाकी काही आम्हाला फारसं बोलायची सवय नाही," असं फेसबुक पोस्टमध्ये सलमानला धमकी देताना नमूद करण्यात आलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई याच्या अंकाऊटवरुन फेसबुक पोस्ट समोर आली आहे. याचा तपासही पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. लॉरेन्स बिष्णोई गँगमधील रोहित गोदारा कोण आहे? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर चर्चेत आलं नाव - Salman Khan house firing
  2. सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; गोळीबार करतानाचं सीसीटीव्ही आलं समोर - Salman Khan Firing Incident
  3. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला कॉल, अतिरिक्त सुरक्षा पुरवणार - Salman Khan
Last Updated : Apr 15, 2024, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.