ETV Bharat / state

अल्पवयीन मुलींना धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला 48 तासात केली अटक - Vasai Police

Vasai Crime : अल्पवयीन मुलींना धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश आलय.

Vasai Crime
सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी केली अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 12:45 PM IST

Updated : Feb 17, 2024, 1:34 PM IST

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे

वसई (मुंबई) Vasai Crime : नालासोपारा पूर्व आचोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 वर्षांची अल्पवयीन मुलगीसोबत अतिप्रसंग घडला होता. चष्मा विसरल्याने 13 फेब्रुवारी रोजी घरी आली असता, तिच्या बिल्डिंग मध्ये येऊन, तिला एकटीला एकानं गाठलं. तिचा हात पकडून, तिला जबरदस्तीने इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून ही व्यक्ती फरार झाली होती. याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात भादंवी कलम 377, 363 सह पोक्सो 4, 6, 8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

गुजरात येथून केली अटक : गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी आदेश काढले. त्यानुसार वसई गुन्हे शाखा कक्ष दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूरज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, यांच्या पुढाकारातून स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आलं. या पथकानं गुजरात येथून बगावत शंकर मारवाडी (वय २८) याला अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. गुप्त बातमीदार यांच्या माध्यमातून प्रथम आरोपीची ओळख पटवली असता, तो नालासोपारा पश्चिम बस आगारा जवळील झोपडीत तर कधी डोंबिवली, कल्याण परिसरात राहत असल्याचं समोर आलं आहे.

युट्युबवर पाहायचा अश्लील व्हिडीओ : आरोपी फुगे, खेळणी विकण्याचं काम करतो. त्याचं त्याच्या बायकोशी पटत नव्हतं. त्यामुळं तो तिच्याकडे फक्त येऊन-जाऊन असायचा. त्याचे नातेवाईक डोंबिवली येथे राहत होते. तो युट्युबवर अश्लील व्हिडीओ पाहत असल्यानं त्याच्यामध्ये विकृती निर्माण झाली होती. त्याचे आणि पत्नीचे संबंध बिघडल्यानं आपली असुरी वासना पूर्ण करण्यासाठी त्याने ५ ऑक्टोबर २३ रोजी एका मुलीवर अत्याचार करण्यासाठी बिल्डिंगच्या आडोशाला घेवून गेला होता. मात्र, त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तो पळून गेला होता. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. मात्र १३ फेब्रुवारी २४ चा गुन्हा त्याला तुरुंगात घेवून गेला.

आरोपीने आणखी किती गुन्हे केले : या आरोपीने नालासोपारा पूर्व ओसवाल नगरी, बाबा संकुल जवळही 4 ते 5 महिन्यांपूर्वी 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारचे आणखी किती गुन्हे या आरोपीने केले आहेत याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -

  1. क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना
  2. Pune Crime : नात्याला काळीमा! भावाच्या मुलींवर केला अत्याचार
  3. Physical abused on minor : नराधमाचा तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार; वर्ध्यातील संतापजनक प्रकार

Last Updated : Feb 17, 2024, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.