छत्रपती संभाजीनगर Ajintha Bank CEO Arrested : पतसंस्थांमधील घोटाळे उघड होत असल्यानं सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित आहे, का असा प्रश्न निर्माण होत आहे. अजिंठा अर्बन घोटाळा प्रकरणी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. बँकेतील 97.41 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयानं त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर संचालक मंडळावर कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित झालाय. याआधी आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यात संचालक अंबादास मानकापे याला अटक करण्यात आलं आहे. मात्र अद्याप ठेवीदारांच्या ठेवी अद्याप मोकळ्या झाल्या नाहीत. त्यामुळे अजिंठा बँकेतील खातेदारांना पैसे मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झालाय.
![Ajintha Bank CEO Arrested](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/03-08-2024/mh-aur-1-bank-arrest-7206289_03082024091454_0308f_1722656694_162.jpg)
असा झाला होता घोटाळा : अजिंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांवर आता कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेचे चेअरमन माजी आमदार सुभाष झांबड, सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल सतीश मोहरे यांच्यासह शाखा व्यवस्थापकांचा आरोपीमध्ये समावेश करण्यात आला. आरोपींनी मार्च 2016 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 64.60 कोटी रुपयांची मुदत ठेव रक्कम बँकेच्या लेजर बुकमध्ये खोटी आणि बनावट दाखवल्याचा आरोप आहे. तसेच 31 मार्च 2023 मध्ये 32.81 कोटी रुपयांची रक्कम ही एसबीआय, अॅक्सिस आणि एमएससी बँकेच्या खात्यात जमा असल्याचं खोटे प्रमाणपत्र तयार केले. त्यासंदर्भातील खोटा हिशोब दाखवून, विना तारण कर्ज वाटप करुन बँकेची 97.41 कोटींचा अपहार केल्याचं उघड झालं. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना आता अटक केली आहे.
इतरांवर कारवाई कधी : बँकेतील घोटाळा झाल्याचं उघड झाल्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणले आहेत. ठेवीदारांचे पैसे पूर्ण केले जातील, असं आश्वासन संचालक असलेले माजी आमदार सुभाष झांबड यांनी दिले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 7 महिन्यांनी पहिली कारवाई करण्यात आली. मात्र संचालक मंडळावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आहे. शुक्रवारी आदर्श बँकेच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळानं माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी जमा असलेल्या पैश्यांमधून ठेवीदारांनी किमान दहा हजार रुपये देण्यास प्रारंभ सुरू करा अशा सूचना दिल्या. मात्र को ऑपरेटिव्ह बँकेत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत, का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थितीत झाला आहे.
हेही वाचा :