ETV Bharat / state

पंतप्रधान मोदी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द - PM Narendra Modi Visit Jalgaon

PM Narendra Modi Visit Jalgaon Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (25 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱयावर येत आहेत .जळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'लखबती दीदी' योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय.

PM Narendra Modi Visit Jalgaon Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source : PM Narendra Modi X AC)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 10:00 AM IST

Updated : Aug 24, 2024, 10:12 AM IST

छत्रपती संभाजीनगर PM Narendra Modi Visit Jalgaon Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे लखपती दीदी योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. या दौऱ्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज करण्यात आलीय. दुपारी १२ ते २ या काळात प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे हा कार्यक्रम होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळं हा कार्यक्रम होत असल्याचं बोललं जातंय. या निमित्तानं भाजपाचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू होईल, अशी शक्यता आहे. ऐनवेळी पंतप्रधान मोदींनी जिल्ह्यातील काही माहिती विचारली तर अडचण नको याकरिता जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

असा असेल पंतप्रधान मोदी यांचा दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी महाराष्ट्र दौरा आहे. ते सकाळी दिल्ली येथून निघणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. तिथून हेलिकॉप्टरद्वारे जळगावकडं रवाना होतील. सकाळी ११.१५ ते १२ पर्यंत बचतगटाच्या महिलांशी संवाद साधतील. त्यानंतर प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथील लखपती दीदी कार्यक्रमाला हजेरी लावतील. दुपारी १२ ते १.३५ पर्यंत ते कार्यक्रमात राहतील. तेथून पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून ते राजस्थानला जातील.

सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी दौरा असल्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांची हक्काची चौथ्या शनिवारची आणि रविवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमधून पंतप्रधान जाणार असल्याने, अचानक त्यांनी काही माहिती मागवली तर ती उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सरकारी सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

काय आहे लखपती दीदी योजना? : पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालवली जाते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले आहे.

लखपती दीदी योजनेसाठी पात्रता : या योजनेसाठी वयोमर्यादा नाही. सर्व भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावे लागेल.

अर्ज कसा करायचा : या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 'सेल्फ हेल्प ग्रुप' व्यवसाय योजना तयार करावी लागेल. - व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडं पाठवेल. यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल. अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिलं जातं.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेन्स्कींची गळाभेट; तुमचा मोठा प्रभाव आहे, रशिया युद्धात मधस्थी केल्यास आनंदच; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास - PM Modi Meets Zelenskyy

Last Updated : Aug 24, 2024, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.