ETV Bharat / state

पावसाचा फटका! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द - PM Modi Pune Visit Cancelled

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 11:35 AM IST

PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळं पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

PM Narendra Modi Pune visit cancelled due to heavy rain in Pune
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द (ETV Bharat)

पुणे PM Modi Pune Visit Cancelled : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (26 सप्टेंबर) पुणे दौरा होता. त्यांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या अंडरग्राउंड मेट्रोचं उद्घाटन होणार होतं. तसंच या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील एस.पी. महाविद्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

मोदींच्या दौऱ्यावर पावसाचं सावट : दोन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून शहरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच आज शहरातील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात आज मोदींची सभा होणार होती. मात्र, तिथं पावसामुळं मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. बुधवारी (25 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच पर्याय म्हणून पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे देखील प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आली होती. मात्र, आता पंतप्रधान मोदींचा आजचा संपूर्ण दौराच रद्द झालाय.

कसा होता मोदींचा पुणे दौरा? : पंतप्रधान मोदी दुपारी 4 वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तेथून मेट्रोनं ते स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीनं एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. तसंच मोदींच्या हस्ते मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार होतं. यात स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पुण्यात सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोदींच्या सभेवर पाणी फेरल्याचं बघायला मिळतंय.

हेही वाचा -

  1. राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर; जाणून घ्या कुठं कोणता अलर्ट? - Maharashtra rain
  2. पुण्यात मुसळधार! अनेकांच्या घरात शिरलं पाणी; खडकवासला धरणातून यंदाचा सर्वाधिक 45 हजार क्युसेक विसर्ग - Pune Rain Updates
  3. पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.