ETV Bharat / state

पीयूष गोयल जिंकले पण....गोपाळ शेट्टींच्या तुलनेत किती मताधिक्य घटलं? - North Mumbai Lok Sabha - NORTH MUMBAI LOK SABHA

North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबई मतदारसंघात भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा 3.57,608 मतांनी पराभव केलाय. मात्र, त्यांचं मताधिक्य एक लाखापेक्षा जास्त मतांनी घटलंय.

North Mumbai Lok Sabha
North Mumbai Lok Sabha (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 12:38 PM IST

मुंबई North Mumbai Lok Sabha : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचं वर्चस्व होतं. या तिन्ही मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार भाजपानं बदलले होते. उत्तर मुंबई हा भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ या मतदारसंघातून मागील दोन टर्म गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार निवडून येत होते. परंतु यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना या मतदारसंघात उतरवण्यात आलं. पीयूष गोयल यांनी 6,80,146 मत घेत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा 3.57,608 मतांनी पराभव केलाय. परंतु आतापर्यंत गोपाळ शेट्टी यांनी मागील दोन टर्ममध्ये मतदारसंघात सर्वात जास्त लीड घेतलं होतं. त्यात एक लाखापेक्षा जास्त मतांनी हे मताधिक्य कमी झालंय.

सुरुवातीपासून घेतलेला लीड शेवटपर्यंत कायम : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालाय. मुंबई उत्तर हा मतदारसंघ भाजपसाठी मुंबईतच नाही तर राज्यातील सर्वात सुरक्षित असा मतदार संघ मानला जातो. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बोरिवली - सुनील राणे, दहिसर - मनीषा चौधरी, कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर, चारकोप - योगेश सागर हे भाजपचे आमदार असून मगाठणे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत. तर मालाड पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहेत. अशाप्रकारे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व असल्याकारणानं हा मतदारसंघ भाजपसाठी अतिशय सुरक्षित मानला जातो.

यंदाच्या निवडणुकीत भाजपनं विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट करून या जागेवर पीयूष गोयल यांना उतरवलं होतं. मागील दोन टर्म पासून भाजपचे गोपाल शेट्टी या भागातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 ते 5 टक्क्यांनी घट झाली होती. येथे 57.02 टक्के मतदान झाल. एकतर्फी झालेली ही लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या मतदारसंघात भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांनी सुरुवातीपासूनचे लीड शेवटपर्यंत कायम ठेवलं.

विधानसभानिहाय झालेलं मतदान

  • बोरिवली - 62.50 टक्के
  • दहिसर - 58.12 टक्के
  • मागाठणे - 55.66 टक्के
  • कांदिवली पूर्व - 54.48 टक्के
  • मालाड - 53.52 टक्के
  • चारकोप - 57.83 टक्के

उशिरा उमेदवारीचा फटका : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी पीयूष गोयल यांच्या उमेदवारीची घोषणा सर्वात अगोदर करण्यात आली. मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी सर्वात पहिलं जनसंपर्क कार्यालय हे उत्तर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं. या कारणानं पीयूष गोयल यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात फार मोठी आघाडी घेतली होती. तर दुसरीकडं या जागेवर उमेदवार घोषित करण्यास महाविकास आघाडीनं फार उशीर केला. या जागेवर उद्धव ठाकरे गटानं उमेदवार द्यावा, अशी विनंती काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना केली होती. यासाठी माजी आमदार विनोद घोसाळकर यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर अखेर काँग्रेसकडून भूषण पाटील यांना अखेरच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं. याचा मोठा फटका महाविकास आघाडीला या निवडणुकीत बसला.

विजय झाला, पण मताधिक्य घटलं : 2019 च्या निवडणुकीत भाजपचे गोपाल शेट्टी यांना येथून 7,06,678 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना 2,41,431 मतं मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीत गोपाल शेट्टी यांना 6,64,004 मतं मिळाली होती. काँग्रेसचे संजय निरुपम यांना 2,17,422 मतं मिळाली होती. 2019 मध्ये गोपाळ शेट्टी यांना 4,65,247 इतकं मताधिक्य होतं. तर 2014 मध्ये 4,46,582 इतकं मताधिक्य होतं. यंदा पीयूष गोयल यांनी 6,80,146 मतं जरी घेतली असली तरी त्यांचं मताधिक्य हे गोपाळ शेट्टी यांच्या तुलनेत 1,07,639 मतांनी घटलं आहे.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.