ETV Bharat / state

पिंपरी चिंचवड शहरात हिट अँड रन; भरधाव कारनं महिलेला उडवलं, घटनास्थळावरुन पळ काढणाऱ्या पोलिसाच्या मुलाला ठोकल्या बेड्या - Pimpri Chinchwad Hit And Run Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 7:23 AM IST

Updated : Jun 14, 2024, 2:37 PM IST

Pimpri Chinchwad Hit And Run Case : पुण्यात हिट अँड रनच्या प्रकरणानं देशभरात खळबळ उडवली. आता तशीच घटना पिंपरी चिंचवड इथं घडली आहे. पोलिसाच्या मुलानं एका महिलेला भरधाव कारनं उडवलं. धडक दिल्यानंतर चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला.

Pimpri Chinchwad Hit And Run Case
घटनास्थळ (Reporter)
पिंपरी चिंचवड शहरात हिट अँड रन (Reporter)

पुणे Pimpri Chinchwad Hit And Run Case : पिंपरी चिंचवड शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारनं धडक दिल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशीमधील स्वराज रेसिडेन्सी समोर घडली. भरधाव कारनं धडक दिल्यानं महिला गंभीर जखमी झाली. धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला. पुण्यात हिट अँड रनच्या घटनेनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अँड रनची घटना घडल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे. दरम्यान कारन महिलेला धडक देणारा पोलिसाचा मुलगा असून विनय विलास नाईकेरे असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलानं भरधाव कारनं महिलेला दिली धडक : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाकडून ही अपघाताची घटना घडली. या प्रकरणी जीवराम तेजाराम चौधरी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवी कलम 279, 337, 338, मोटार वाहन कायदा 184, 119/177 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रं फिरवत कार चालक विनय विलास नाईकेरे (23) याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

महिला सात ते आठ फूट उंच उडून पडली खाली : आपल्या मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारनं जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की कारच्या धडकेत महिला जवळपास 7 ते 8 फूट उंचावर उडून खाली पडली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी सरकारचं षडयंत्र, अनिल देशमुखांच्या दाव्यानं खळबळ - Pune hit and run case
  2. दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case
  3. मुलाचा 'कार'नामा! वडील, आजोबा अन् आता आई अटकेत; विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा - Pune Porsche accident case

Last Updated : Jun 14, 2024, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.