अमरावती PhD Research : गेल्या काही वर्षात देशात पीएचडी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या विविध विद्यापीठातून झालेलं संशोधन आज विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये कुलुप बंद आहे. त्याचा सरकार अथवा समाजाला काही उपयोग होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
देशातील 1074 विद्यापीठामधून होतेय संशोधन : देशात विद्यापीठ अनुदान आयोगाशी (UGC) संलग्नित राज्य विद्यापीठ 460, 128 मानद विद्यापीठ, 56 केंद्रीय विद्यापीठ आणि 430 खासगी असे एकूण 1074 विद्यापीठ आहेत. देशभरातील या विद्यापीठांमधून दरवर्षी शेकडो पीएचडी प्रदान केल्या जातात. पीएचडीची डिग्री मिळवण्यासाठी संशोधन केलं जातं. संशोधनाच्या करण्यासाठी संशोधकाला केंद्र आणि राज्य सरकारकडून लाखो रुपयांची फेलोशिप दिली जाते. संशोधकानं कठीण परिश्रम घेऊन केलेलं मात्र संशोधन सरकार किंवा समाजाच्या उपयोगी पडत नसल्याची माहिती आहे. सामजिक, विज्ञान, कृषि, विज्ञान, इंजीनियरिंग, फार्मसी यासह अनेक विषयांत संशोधन केलं जाते. मानवाच्या विकासासाठी संशोधनाचा वापर केला जातो. ज्ञानाच्या प्रगतीमध्ये आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये संशोधन हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संशोधनाचा उपयोग केला जातो. नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं विकसित करण्यासाठी संशोधन आवश्यक आहे.
संशोधकांचं निष्कर्ष, सूचना विद्यापीठाच्या कुलुपात बंद : संशोधनाच्या करण्यासाठी संशोधकाला केंद्र आणि राज्य सरका कडून लाखो रुपयांची फेलोशिप दिली जाते. संशोधकानं कठीण परिश्रम घेऊन काढलेले निष्कर्ष, सूचना सरकार किंवा समाजाच्या उपयोगी पडत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. संबंधित विषयातील संशोधन करताना एखादया नवसंशोधकाला संदर्भा ग्रंथापुरता मर्यादित उपयोग होतो.
मागणी केल्यास संशोधन उपलब्ध करुन देऊ : संत गाडगेबाबा विद्यापीठात विविध विषयावर संशोधन झाले आहेत. संशोधनमधून निघालेले निष्कर्ष आणि सूचना किंवा शोधप्रबंध याबाबत शासनाकडून माहिती मागितल्यास तत्परतेनं उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांनी दिली. तसंच संशोधन हे समाजपयोगी असावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 1 मे 1983 रोजी स्थापन झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून दरवर्षी सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान, फार्मसी साधारणपणे अडीचशे ते तीनशे संशोधकांना पीएचडीची पदवी प्रदान करण्यात येते. एकेचाळीस वर्षामध्ये अंदाजे दहा हजारच्यावर पीएचडी विद्यापीठ देण्यात आल्याची माहिती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पीएचडीची कक्षाचे उप कुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण यांनी दिली.
प्राध्यापकानं पीएचडी केल्यास मिळते पगारात वाढ : वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाला असोसिएट प्रोफेसर श्रेणी मध्ये असताना पीएचडीची पदवी असणं आवश्यक आहे. ती केल्यास पगारात भरघोस वाढ मिळते. सोबतच संशोधन पेपर नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित करणं आवश्यक आहे. त्याचाही अधिकचा लाभ प्राध्यापकाला मिळतो. परंतु, त्यांनी केलेलं संशोधन कुणाच्या उपयोगी पडते, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. संशोधनामधील निष्कर्षाचा समाजाला लाभ होऊ शकतो. त्यासाठी शासन तसंच विद्यापीठ स्तरावर एखादी व्यवस्था निर्माण झाल्यास त्यात योगदान देण्याची तयारी असल्याची माहिती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी दिली.
हेही वाचा :