ETV Bharat / state

चिमुकलीवर शाळेत अत्याचार; बदलापूरमध्ये संतप्त जमावानं रेल्वेसेवा रोखली, आरोपीला फाशीची मागणी - Badlapur Girls Sexually Assaulted - BADLAPUR GIRLS SEXUALLY ASSAULTED

Badlapur Girls Sexually Assaulted : बदलापुरात एका चार वर्षीय चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावानं बदलापूर येथे रेल्वेसेवा रोखली. यामुळे १० मेल आणि एक्सप्रेस रेल्वे वळवण्यात आल्या आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Man Raped On 4 Year Girl
बदलापूरमध्ये जमावानं रेल्वेसेवा रोखली (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 11:50 AM IST

Updated : Aug 20, 2024, 3:01 PM IST

ठाणे Badlapur Girls Sexually Assaulted : बदलापूर शहरातील एका विद्यालयातील चार वर्षाच्या चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावानं रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन केलं. संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे आज सकाळपासून रेल्वेसेवा कोलमडली आहे. या घटनेतील आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. लाडकी योजना नको, पण महिला सुरक्षिततेची योजना द्या, अशी मागणीही आंदोलक यावेळी करत आहेत. यामुळे रेल्वेवाहतुकीवर परिणाम झाल्यानं १० गाड्या वेगळ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत.

संतप्त झालेल्या महिला (ETV Bharat Reporter)

संतप्त नागरिक उतरले रेल्वे ट्रॅकवर : सोमवारी देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा झाला. यावेळीही बदलापूरमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सोमवारी काही वेळ 'बदलापूर शहर बंद'ची हाक देण्यात आली होती. परंतु आज दिवसभर बंदची हाक देण्यात आली असून संतप्त नागरिक रस्त्यावर तसेच रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला आहे.

नराधमाला फाशी द्या, फाशी द्या : पहाटे सहा वाजतापासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र आठ वाजतापासून कर्जतच्या दिशेनं येणारी आणि मुंबईच्या दिशेला जाणारी एकही रेल्वे गेली नाही. पुरुषाबरोबर महिलाही रेल्वे ट्रॅकवर उतरल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा रेल्वे स्थानकात तैनात करण्यात आला आहे. यावेळी हातात फलक घेऊन घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसेच मोठमोठ्यानं घोषणाबाजी करण्यात येत आहे. वी वॉन्ट जस्टीस... फाशी द्या... फाशी द्या आरोपीला फाशी द्या... अशी घोषणाबाजी संतप्त जमावाकडून होत आहे.

लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण योजना द्या : आज सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकात 'रेल रोको' आंदोलन करण्यात येत आहे. पालकांसह नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली. शहरातील एका विद्यालयात शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या नराधमाच्या फाशीची मागणी केली आहे. संतप्त झालेल्या नागरिक त्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. सरकारच्या माध्यमातून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षित बहीण योजना सरकारनं द्यावी, अशी मागणी यावेळी नागरिक करत आहेत. किती दिवस नागरिकांनी मेणबत्ती जाळायच्या, एक दिवस बलात्काऱ्याला जाळू, अशा संतप्त भावना नागरिक या आंदोलनात व्यक्त करत आहेत.

घटनेचा आढावा घेताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी (ETV Bharat Reporter)

संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड : बदलापूर शहरात चार दिवसापूर्वी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. घटना घडलेल्या शाळेची नागरिकांनी तोडफोड केली. त्यामुळं या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या घटनेत शाळेतील जे जबाबदार व्यक्ती असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी संतप्त जमावाने केली. दरम्यान, या शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

हेही वाचा :

  1. सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane
  2. बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide
  3. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News

Last Updated : Aug 20, 2024, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.