ETV Bharat / state

शरद पवारांबाबत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याची पक्ष गंभीर दखल घेणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा - SHARAD PAWAR

शरद पवारांबाबत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याची पक्ष गंभीर दखल घेणार असून, भाजपाला कुठल्याही ऑपरेशनची गरज नसल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2024, 12:36 PM IST

मुंबई - मारकडवाडी येथे भाजपाकडून घेण्यात आलेल्या सभेत बोलताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य केलंय. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा सर्व बाजूने निषेध होत असताना भाजपाने सुद्धा या प्रकरणात लक्ष घालत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. तसेच काँग्रेस पक्षात अस्वस्थ असलेले अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोटसुद्धा त्यांनी केलाय, ते मुंबईत बोलत होते.

गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली : ईव्हीएम प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठ्या प्रमाणात जुंपलीय. मारकडवाडीत शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर त्याला विरोध म्हणून मंगळवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या भाजपा आमदारांनी तिथे सभा घेत शरद पवार यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. यादरम्यान बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. यावरून आता गोपीचंद पडळकर यांच्यावर सर्व बाजूने टीका होत असताना भाजपा पक्षानेसुद्धा या प्रकरणाची दखल घेतलीय. या मुद्द्यावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत की, शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. तरीसुद्धा त्यांच्यावर अतिशय खालच्या पद्धतीत वैयक्तिक टीका करणे हे पक्षाला मान्य नाही. ज्यांनी या पद्धतीचे वक्तव्य केले आहे, त्यांना आम्ही योग्य समज देऊ. तसेच याबाबत पक्ष योग्य ती दखल घेईल. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर अशा पद्धतीची टीका कोणीही करू नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही : राज्यात लवकरच ऑपरेशन लोटस केलं जाणार असून, काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार भाजपात प्रवेश करणार आहेत. अशी चर्चा सर्वत्र पसरलीय. या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्हाला कुठलंही ऑपरेशन करायची काही गरज नाही. आम्ही ऑपरेशनमध्ये कधी पडत नाही. काँग्रेसचे त्यांच्या आमदार, खासदारांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाहीत. निवडून आलेला प्रतिनिधींना पक्ष म्हणून आधार द्यावा लागतो. तो काँग्रेसमध्ये दिला जात नाही, म्हणून काँग्रेसमध्ये आमदार, खासदार अस्वस्थ आहेत. काँग्रेसमध्येच नाही तर महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांमध्ये ही अस्वस्थता आहे. निवडून आल्यावर जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना काम करावी लागतात किंवा जनतेला न्याय द्यावा लागतो. त्याकरिता जे पक्ष म्हणून पाठबळ लागतं ते पाठबळ त्यांना मिळत नाही. म्हणून अनेक मोठे नेतेही नाराज आहेत. अनेक जण आमच्या संपर्कात असून जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे.

केंद्रीय नेतृत्वाशी बोलून मंत्रिमंडळ विस्तार : मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून यावर निर्णय घेतील. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलेही मतभेद नसून योग्य पद्धतीने योग्य वेळी सर्व काही व्यवस्थित होईल, असंही बावनकुळे म्हणालेत.

हेही वाचा -

  1. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतच जुंपली; दिल्लीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार?
  2. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये तफावत? निवडणूक आयोगानं दिलं थेट स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.