ETV Bharat / state

"फक्त परमवीर सिंगच नव्हे तर मविआ सरकारकडून मलाही...", मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा - CM Eknath Shinde

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 9:28 PM IST

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण 100 कोटींची वसुली न केल्यास आपल्याला खोट्या प्रकरणात अडकविण्याचा धाक दाखविला गेला असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि परमवीर सिंग (ETV Bharat) (ETV Bharat Reporter)

मुंबई CM Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी थेट त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकला होता. त्या लेटरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपणाला १०० कोटीची वसुली करण्यास सांगतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रात केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये जर वसुली केली नाही तर तुम्हाला अटक केली जाईल, अशीही भीती आपणाला दाखवली होती, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर काही खळबळजनक आरोप केले आहेत.

मलाही अडकवण्याचा प्रयत्न : आज माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लवकरच मराठा आरक्षणावर बैठक बोलावण्यात येईल. यावर तोडगा काढण्यात येईल." परमवीर सिंह यांनी महाविकास आघाडीवरत काही गंभीर आरोप केले आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले "मलाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडकवण्याचा प्रयत्न झाला. ही वस्तुस्थिती आहे. विरोधकांना अडकवण्याचं आणि त्यांना अडचणीत आणण्याचं किंवा त्यांच्यावर केस दाखल करण्याचं समजू शकते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मी समजू शकतो. परंतु मी तर सत्तेतील सहकारी होतो. तरीसुद्धा मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला."

  • योग्य वेळी सविस्तर बोलेल : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडा केली की, "मला महाविकास आघाडी सरकारमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर मी नंतर सविस्तर बोलणार आहे. सविस्तर भूमिका मांडणार आहेत. परंतु आता यावर काही बोलणार नाही. योग्य वेळी उत्तर देईन.

परमवीर सिंग यांच्या आरोपावर सलील देशमुख यांचा पलटवार- खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गानं गोळा केलेला पैसा हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं जातो, असे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला. तेव्हा जयंत पाटील यांच्याकडं राष्ट्रवादीच्या निधीची जबाबदारी होती. अनिल देशमुख हे 2019 ते 2021 मध्ये राज्याचे गृहमंत्री होते. तेव्हा त्यांनी १०० कोटींचे उद्दिष्ट दिले होते, असा पुनरुच्चार मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केला. यावर अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी परमवीर सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. परमवीर सिंग हे सत्ताधारी भाजपाची आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट वाचत आहेत, अशी टीका सलील देशमुख यांनी केली.

हेही वाचा:

  1. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती मराठा उमेदवाराला संधी देणार? - Rajya Sabha By Election 2024
  2. मराठा आरक्षण आंदोलन : आंदोलनात राजकीय बोलाल, तर जशास तसं उत्तर देऊ, नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा - Nitesh Rane Slams Manoj Jarange
  3. "माझ्याविरोधात बोलले त्यांना मागच्या..."; मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना टोला - Maratha OBC Reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.