मुंबई Padma Award 2024 : केंद्र सरकारनं पद्म पुरस्कार 2024 ची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारात या वर्षीही महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्र सरकारनं पद्म पुरस्कार 2024 ची यादी जाहीर केली असून यात एकूण 110 पद्मश्री तर 17 पद्मभूषण पुरस्काराचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री तर सहा जणांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार : केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पद्म पुरस्कार 2024 मध्ये सहा मराठी दिग्गजांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
कोणाला देण्यात आला पद्मभूषण पुरस्कार : केंद्र सरकारनं एकूण 17 पद्मभूषण पुरस्काराची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
सर्वोच्च नागरी पुरस्कार : केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तीन पुरस्कार देऊन अद्वितीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात येतो. पद्म पुरस्कार हा कला, साहित्य, क्रीडा, वैद्यकीय, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
हेही वाचा :