मुंबई - Mumbai police recovered money : अभिनेता राकेश बेदी यांच्या पत्नीची फसवणूक झाली होती. राकेश बेदी यांच्या पत्नीच्या खात्यातून जवळपास पाच लाख रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 48 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावला आहे आणि बेदी यांच्या अकाउंटवर गायब झालेले पैसे पुन्हा मिळवून देण्यात यश ओशिवरा पोलिसांना यश मिळाल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी दिली आहे.
राकेश बेदी यांचीही जानेवारी 2024 मध्ये अशाच प्रकारे 80 हजार रुपयांना फसवणूक झाली होती. राकेश बेदी यांच्या पत्नीला एक बनावट फोन कॉल आला होता. याच फोन कॉल मुळे त्यांच्या बँक खात्यातील जवळपास पाच लाख रुपये अचानक गायब झाले होते.
राकेश बेदी यांच्या पत्नीच्या हा सर्व फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठले. उशिरा पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि सायबर अधिकारी अशोक कोंडे यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. खात्यातून गायब झालेली रक्कम फ्रिज केल्यामुळे बेदी कुटुंबीयांना ती रक्कम परत मिळाली. ओशिवरा पोलिसांनी ज्या थर्ड कंपनीला पाच लाखांची रक्कम गेली होती त्या कंपनीशी संपर्क साधून पोलिसांनी ती रक्कम फ्रीज केली.
जानेवारी 2024 मध्ये सायबर ठगांनी कॉमेडियन राकेश बेदी यांची 80 हजार रुपयांची फसवणूक केली होती, आता ठगांनी त्यांची पत्नी आराधना यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये लंपास केले आहेत.
59 वर्षीय आराधनाने ओशिवरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, तिचे आणि तिचे पती राकेश बेदी यांचे संयुक्त खाते आहे. ३ मे रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. सुरुवातीला त्यांनी तो रिसिव्ह केला नाही आणि नंतर त्यांना सलग पाच फोन आले. 5.28 वाजता कॉल उचलला तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या खात्यातून माझ्या खात्यात 498694.50 रुपये चुकून ट्रान्सफर झाले आहेत आणि मला ते परत करावे लागतील. तुम्हाला OTP मिळाला असेल, कृपया OTP सांगा. आराधनाने त्या व्यक्तीला सांगितले की, तिने कोणतेही पैसे ट्रान्सफर केले नाहीत. त्यानंतर, त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याचा मेसेज बॉक्स चेक केला तेव्हा त्याला ॲक्सिस बँकेच्या नावाने एक ओटीपी मेसेज आढळला.
संयुक्त बँक खाते असल्याने, त्यांनी पती राकेश बेदी यांच्याशी पुष्टी केली. मात्र त्यांनी कोणताही व्यवहार केला नसल्याचं सांगितलं. या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या सायबर अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटत आहे की, आराधना यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नसताना पैसे कसे ट्रान्सफर केले गेले. अधिक तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.
हेही वाचा -