ETV Bharat / state

अरविंद केजरीवाल अटकेत ; 'हा लोकशाहीचा खून': विरोधी पक्षांचा सरकारवर हल्लाबोल - ED Arrested Arvind Kejriwal - ED ARRESTED ARVIND KEJRIWAL

ED Arrested Arvind Kejriwal : दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी भाजपा, सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ED Arrested Arvind Kejriwal
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 7:19 AM IST

Updated : Mar 22, 2024, 7:47 AM IST

मुंबई ED Arrested Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे तिव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात इंडिया आघाडीनं जोरदार मोर्चा उघडला आहे. आज आम आदमी पक्षाच्या वतीनं देशभरात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेत अरविंद केजरीवाल यांना सर्वतोपरी कायदेशीर मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडं महाराष्ट्रातील नेत्यांनीही भाजपावर हल्लाबोल केला.

हुकूमशहाला मेलेली लोकशाही निर्माण करायची : घाबरलेल्या हुकूमशहाला मेलेली लोकशाही निर्माण करायची आहे. पक्ष फोडणं, संस्था काबिज करणं, कंपन्यांकडून पैसे उकळणं, विरोधी पक्षांचे बँक खाते गोठवणं अशी कामं करण्यात येत आहेत. आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक केली आहे. 'इंडिया' आघाडी या अटकेविरोधात चोख प्रत्युत्तर देईल, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर नमूद केलं आहे.

शरद पवारांची भाजपा केंद्र सरकारवर टीका : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. "केंद्रीय यंत्रणाचा विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्यासाठी वापर करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला डोळ्यापुढं ठेऊन ही अटक करण्यात आली आहे. मात्र इंडिया आघाडी अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेच्या विरोधात ठामपणे उभी राहील," असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एक्सवर नमूद केलं आहे.

राजकीय द्वेशातून अरविंद केजरीवाल यांची अटक : "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक ही राजकीय द्वेशातून करण्यात आली आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ही भाजपा सरकारनं केलेली अटक आहे. मात्र आम्ही संवैधानिक लोकशाही टीकवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एकजुटीनं उभं आहोत," असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक्सवर नमूद केलं आहे.

हेही वाचा :

  1. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक; 'आप'ची सर्वोच्च न्यायालयात धाव - ED Arrest Arvind Kejriwal
  2. "केजरीवाल यांच्या विचारसरणीला अटक करू शकत नाहीत"; अटकेनंतर 'आप' नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल - Arvind Kejriwal arrested

Last Updated : Mar 22, 2024, 7:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.