ETV Bharat / state

महायुती सरकारचा अर्थसंकल्प 'गाजर' : सरकारच्या घोषणा म्हणजे जुमले; अर्थमंत्री अजित पवारांच्या उत्तरावर विरोधक असमाधानी - Maharashtra budget

Maharashtra budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला दिलेल्या उत्तरानं समाधानी नसल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 7:12 PM IST

Vijay Wadettiwar, Eknath Shinde
विजय वडेट्टीवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Etv Bharat MH Desk)

मुंबई Maharashtra budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र, पुन्हा अधिवेशनात दुसऱ्यांदा अर्थसंकल्प का सादर केला?, हे आम्हाला कळालेलं नाही. हे बजेट केवळ सवंग लोकप्रियतेसाठी होतं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारला लगावला आहे.

विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter)

राज्याची आर्थिक स्थिती ढसळली : राज्याची आर्थिक स्थिती सातत्याने ढासळत आहे. हे निवडणूकपूर्व बजेट आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना लोकप्रिय घोषणांचा वापर या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. एकेकाळी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असायचा. आता दरडोई उत्पन्नात देशात महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक आहे. मात्र, असं असतानाही महाराष्ट्राची स्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगली वाटतेय. 2028 पर्यंत एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राला गाठायची असेल, तर आर्थिक विकास दर वार्षिक सतरा टक्के असावा, असा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार समितीनं दिलाय. आमचा सध्याचा आर्थिक विकास दर साडेपाच टक्के आहे. जो अत्यंत कमी आहे. त्यामुळं ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था हे स्वप्नच आहे, असा टोला चव्हाण यांनी महायुती सरकारला लगावला.

सरकारच्या घोषणा म्हणजे जुमले : नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं जुमले सांगितले. त्याचप्रमाणे महायुती सरकारच्या घोषणा जुमले आहेत. लाडकी बहीण योजनेचा 46 हजार कोटींचा निधी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दाखवलेला नाही. त्यासाठी केवळ दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीत काय होणार, हे त्यांना माहीत आहे. म्हणजे केवळ तीन महिन्यांसाठी ही योजना राबविली जाईल. ही योजना केवळ निवडणुकीसाठी राबवली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.

समाजव्यवस्था बिघडवण्याचा प्रकार : "अर्थसंकल्पीय चर्चेत आमचे अधिकार कमी करण्याचा प्रकार झाला. अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे फुगवण्याचा प्रकार आहे. समाजकल्याण विभागाच्या प्रत्यक्ष खर्चात तसंच विनियोग खर्चात मोठी तफावत आहे. एकूणच शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील समाजव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी विभागाचा खर्च मागील तरतुदीच्या केवळ 47% आहे. अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी केवळ 25% रक्कम सामाजिक न्याय विभागावर खर्च केली जातेय. कृषी, सामाजिक न्याय, महिला बालविकास, ओबीसींवर होणारा प्रत्यक्ष खर्च कमी आहे", अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. "अजित पवारांनी त्यांच्या भाषणात फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतलं. मात्र, गोळवळकरांच्या, आरएसएसच्या, मनुस्मृतीच्या संस्कृतीला जपणारे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिव, शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहेत. इंदु मिल स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेला निधी खर्च करण्यात आलेला नाही", असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

मुंबईची लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकू : "राज्याचा अर्थसंकल्प 'गाजर' असल्याची जाणीव महाराष्ट्राला झाली आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी होत होती. हे प्रकल्प एसआरएच्या माध्यमातून व्हायला हवं होते. मात्र त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. झोपडपट्ट्या नियमित करण्याची गरज होती. विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याची सरकारची वृत्ती आहे. भाजपासह शिंदे सरकारला मुंबईला लुटायचं आहे. मात्र आमचं सरकार आल्यावर आम्ही या लुटारूंना जाऊ देणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना तुरुंगात टाकलं जाईल", असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.

'हे वाचलंत का :

  1. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा : महिलांना कुठंही जाण्याची गरज नाही; सरकार राबवणार ‘सातारा पॅटर्न’ - शंभूराज देसाई - Chief Minister Ladki Bahin Yojana
  2. 1 हजार 500 रुपयांत काय होणार? 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी महायुतीला सुनावलं - Majhi Ladki Bahin Yojana
  3. "सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न..."; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप - Maharashtra Monsoon Session 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.