ETV Bharat / state

"हा तर, चिंधीचोर नेता"; खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सुषमा अंधारेंची जहरी टीका - Uddhav Thackeray - UDDHAV THACKERAY

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सत्ताधारी तसंच विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. "उद्धव ठाकरे मला महाराष्ट्रारात मुख्यमंत्री बनवा, असा कटोरा घेऊन सहकुटुंब दिल्लीत आले होते. मात्र, त्यांना काँग्रेसनं भाव दिला नाही", अशी टीका त्यांच्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलीय. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलय.

Sushma Andhare , Naresh Mhaske
खासदार नरेश म्हस्के, सुषमा अंधारे (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 4:33 PM IST

मुंबई Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यावरुन विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवलीय. "मला मुख्यमंत्री बनवा", असे म्हणत कटोरा घऊन उद्धव ठाकरे दिल्लीला आल्याचा दावा शिवसेनेचे खासदर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

नरेश म्हस्के, संजय राऊत यांची पत्रकार परिषद (Etv Bharat Reporter)

ठाकरे कटोरा घेऊन दिल्लीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यापूर्वीच ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. घालीन लोटांगण वंदीन चरण अशा, आशयाचं बॅनर दिसू लागल्यानं ठाणे शहरात ठाकरेंविरोधात विरोधकांचा रोष असल्याचं दिसून येत आहे. यावर नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनी त्यांचा लोटांगण दौरा पूर्ण केलाय. 'मला मुख्यमंत्री करा' असं म्हणत ते हातात कटोरा घेऊन दिल्लीत दाखल झाले. मात्र, त्यांना काँग्रेसनं भाव दिला नसल्याचा दावा, नरेश मस्के यांनी केलाय. आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी संजय राऊत यांनी त्यांना दिल्लीत आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गुप्ता बंधूंची भेट घेतली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

हा तर, चिंधीचोर नेता : नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना सुषमा अंधारे यांनी निषाणा साधत जोरदार उत्तर दिलं आहे. नरेश म्हस्के यांच्यासारख्या माणसानं उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणं योग्य नाही. नरेश म्हस्के यांची बौद्धिक, नैतिक ऐपत अजूनही चिंधीचोरच असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. लोटांगण घालणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. उमेदवार कसे द्यायचे हे ठरवण्यासाठी ज्यांच्या पक्षाला दिल्लीला विचारावं लागतं, त्या पक्षानं आम्हाला शाहणपण शिकवू नये, अशा चिंधीचोरांच्या बोलण्याकडं आम्ही फारसं लक्ष देत नसल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे. खासदार म्हणून स्वतः अभ्यास करून कर्तृत्व सिद्ध करा. मतदार संघातील विधायक कामावर लक्ष केंद्रित करा, असा टोला देखील अंधारेंनी त्यांना लगावाला आहे. मात्र, अशी अपेक्षा आपण गुणवंत, बुद्धिजीवी, दूरदृष्टी नेत्यांकडून करू शकतो, मात्र, मस्के चिंधीचोर असल्याचा प्रहार त्यांनी केला.

राज्यकर्ते लोटांगणवीर : आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जे बसले आहेत, ते लोटांगण घालूनच बसले आहेत. आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील, तेवढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोटांगण घालायला गेले आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला लागवला आहे. दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही, तर दिल्ली देशाची राजधानी आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीशी झुंज दिली, मोदी, शाहांच्या जुलमी कारभाराशी झुंज देण्याला लोटांगण म्हणता येणार नाही. त्याला स्वाभिमान असं म्हणतात. मात्र, सत्तेतील नेते लोटांगणवीर आहेत. त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. सोनिया गांधीजींच्या पाठिंबामुळं ते देखील मंत्रिमंडळात होते, हे त्यांनी लक्षात घ्यावं, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्टेड की अप्रूव्हड?; 'नारीशक्ती दूत ॲप'वर असा तपासा अर्ज, पाहा व्हिडिओ - Ladki Bahin Yojana
    "माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis
  2. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? "मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी..."- भाजपाची टीका - UDDHAV THACKERAY DELHI VISIT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.