येवला (नाशिक) Onion Export Ban : केंद्र सरकारनं 31 मार्चनंतर कांदा निर्यात बंदी कायम ठेवणार असल्याचे आदेश काढल्यानं कांदा उत्पादक अडचणीत सापडणार आहे. सरकारनं कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप होत आहे.
कांद्यावरील निर्यात बंदी उठवा : कमी पाऊस व पाण्याअभावी मोठ्या कष्टानं कांद्याचं पीक आणलं. मात्र, उन्हाळात कांद्याच्या दरात सध्या घसरण होत आहे. एकंदरीत बघितल तर कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी उठेल, अशी घोषणा झाली होती. मात्र, सरकारनं पुन्हा परिपत्रक काढून ही निर्यात बंदी पुढंही एप्रिल महिन्यातही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. केंद्रानं त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसतेय.
कांदा निर्यात बंदीचं परिपत्रक प्रसिद्ध : लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये, म्हणून केंद्र सरकारनं 31 मार्च 2024 नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्याचा शेतकरीवर्गातून आरोप होत आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं 22 मार्च रोजी एक परिपत्रक काढून 31 मार्च 2024 नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचं म्हटलंय. आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल, या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, अशी आता मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळं येत्या 8 दिवसांनी तरी निर्यातबंदी हटेल.
निर्यात बंदीचा निवडणुकीत बसणार फटका : तीन महिन्यांपासून कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्यानं शेतकरी कांदा निर्यातबंदी उठण्याची प्रतीक्षा करत होते. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ग्राहकांना खूश करण्याच्या नादात शासनानं शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलंय. उन्हाळी कांद्याचं जम्बो उत्पादन घेतलं जात आहे. निर्यातबंदी कायम राहणार असल्यानं कांद्याला जेमतेमच भाव मिळू शकेल. त्यामुळं या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचा :