ETV Bharat / state

नाशिककरांनो सावधान! दोघांना स्वाईन फ्लूची लागण; एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट - Swine Flu

Swine Flu : नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोक वर काढलंय. जिल्ह्यात दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून एका महिलेचा मृत्यू झालाय. त्यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट झालीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 10:08 AM IST

Swine Flu
नाशिककरांनो सावधान! दोघांना स्वाईन फ्लूची लागण; एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट

नाशिक Swine Flu Patient In Nashik : नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली गावातील एका महिलेचा स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झाला असून शहरातील दोघांना स्वाईन फ्लूची लागण झालीय. यामुळं पुन्हा एकदा मनपा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. महापालिकेकडून स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जातोय. सर्दी, खोकला, तापाची लक्षणं असल्यास तातडीनं रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी चव्हाण यांनी केलंय.

एका महिलेचा मृत्यू : एकीकडं नाशिकमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढं गेलाय. अशा तापमानात नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं शिरकाव केला असून दोन रुग्ण हे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात एका महिलेचा आणि पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडं तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सिन्नर तालुक्यातील दातली येथील 63 वर्षीय महिलेचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आलाय.

स्वाईन फ्लूनं पुन्हा डोकं काढलं वर : नाशिक शहरात जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत स्वाईन फ्लूनं थैमान घातलं होतं. शहरात स्वाइन फ्लूच्या आजाराचे तब्बल 150 रुग्ण आढळले होते. त्यात 10 जणांचा बळी गेला होता. त्याचप्रमाणे मनपा बाह्य क्षेत्रात स्वाईन फ्लू रुग्णांचा आकडा 86 इतका होता. त्यापैकी 15 जणांचा बळी गेला होता. त्यामुळं एका वर्षातच शहर आणि जिल्ह्यात 25 जणांचा बळी गेला होता. यानंतर "आता वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्वाइन फ्लूनं शिरकाव केल्यानं आरोग्य आणि वैद्यकीय विभाग अलर्टवर आलाय. गरज पडल्यास शासकीय रुग्णालयात पुन्हा स्वाईन फ्लू कक्ष कार्यान्वित केला जाईल," असंही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

लक्षणं आढळल्यास रुग्णालयात जावं : "शहरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून नागरिकांनी घाबरुन न जाता स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास रुग्णालयात जावं," असं आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी चव्हाण यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. शहाद्यातील म्हसावदच्या डुकरांना स्वाईन फ्लूच! 'अफ्रिकन स्वाईन फिवर' ने मृत्यू झाल्याचा अहवाल
  2. Pigs Infected With Swine Flu: बुलडाण्यात शेकडो डुकरांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू, बाधित क्षेत्रातील जिवंत डुकरे करणार नष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.