ETV Bharat / state

पावसाळ्यात मुंबईकरांच्या मदतीसाठी तैनात राहणार 'आपदा मित्र' - BMC Aapda Mitra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 8:52 PM IST

BMC Aapda Mitra : केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार विविध आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करता यावं, यासाठी प्रात्यक्षिकांसह धडे देण्यासाठी मुंबई महापालिकेनं ‘आपदा मित्र’ हा उपक्रम हाती घेतलाय. पालिकेकडून आतापर्यंत एक हजार स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षण देण्यात आलंय.

one thousand Aapda Mitra of bmc are getting ready to control emergency situations in mumbai
पावसाळ्यात मुंबईकरांच्या मदतीसाठी तैनात राहणार 'आपदा मित्र'

मुंबई BMC Aapda Mitra : पावसाळ्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकेनं पूर, दरड कोसळणे किंवा कोणतीही आपत्ती झाल्यास स्थानिक पातळीवर त्वरित मदत देण्यासाठी एक हजार आपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन भविष्यातील आव्हानांसाठी तयार केलंय. त्यामुळं एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या अगोदर आपदा मित्र घटनास्थळी पोहोचून लोकांना मदत करतील. आपदा मित्रांमध्ये पोलीस, होमगार्ड, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरी संरक्षण आणि इतर स्वयंसेवकांचा समावेश आहे.

5 लाख रुपयांचे विमा संरक्षण : पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या आपदा मित्रांना पालिका राज्य शासनामार्फत प्रतिदिन 150 रुपये भाडे भत्ता दिला जाणार आहे. सोबतच राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिलं जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मुख्य अधिकारी रश्मी लोखंडे म्हणाल्या की, "आपदा मित्र सर्व 24 वॉर्डांमध्ये तैनात केले जाणार आहेत. त्याची यादी मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दलाला दिली जाईल. पावसाळ्यात अनेकदा नागरिकांकडून मदत कक्षाला फेक कॉल किंवा चुकीची माहिती देणारे कॉल येतात, असे प्रकार टाळण्यासाठी देखील आपदा मित्रांची मदत होणार आहे."

पुढं त्या म्हणाल्या की, "मुंबईतील एखाद्या नागरिकानं संकट काळात मदत कक्षाला कॉल केल्यास संबंधित ठिकाणी सर्वात आधी आपदा मित्र पोहोचतील आणि नागरिकांना मदत करतील. त्यानंतर हे आपदा मित्र पोलिसांना किंवा अग्निशमन दलाला घटनेची माहिती देतील. आपदा मित्रांमुळं पोलीस आणि अग्निशमन विभागाचा ताण कमी होणार आहे." राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचंही रश्मी लोखंडे यांनी सांगितलं.

पालिकेच्या माहितीनुसार, आपदा मित्र केवळ पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे, तर 12 महिने 24 तास लोकांना मदत करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. सर्व 1000 आपदा मित्रांना परेल प्रशिक्षण केंद्रात 12 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आलंय. त्या बदल्यात पालिका राज्य सरकारच्यावतीनं आपदा मित्रांना प्रवास भत्ता आणि दररोज 150 रुपये या आधारावर 1800 रुपये देणार आहे.

हेही वाचा -

  1. Aapda Mitra : 'आपदा मित्र' संकल्पना होतेय यशस्वी; विद्यार्थ्यांना मिळतेय आपत्कालीन परिस्थितीतील प्रशिक्षण, नेमका काय आहे उपक्रम?
  2. Training On Emergency Management : बृहन्मुंबई महानगरपालिका देणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण ;'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
  3. देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट; 'या' दिवशी गोरेगाव विभागाचा पाणीपुरवठा होणार 24 तासांसाठी बंद - BMC Water Supply

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.