ETV Bharat / state

सिलेंडर स्फोटानं नागरिक हादरले; चिमुकलीचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Girl Died In Cylinder Blast - GIRL DIED IN CYLINDER BLAST

Girl Died In Cylinder Blast : छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी रात्री घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेत एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

Girl Died In Cylinder Blast
सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर लागलेली आग (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:01 AM IST

छत्रपती संभाजीनगर Girl Died In Cylinder Blast : घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना किराडपरा भागात घडली. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आल्यानं सर्वांची धावाधाव झाली. त्यावेळी घरात घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची बाब समोर आली. सदरील घरात दोन कुटुंब राहत असून, या घटनेत पाच जण जखमी तर सफद पठाण या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान वेळेवर आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या आठवड्यात गॅस गळती होऊन स्फोट होण्याची ही दुसरी घटना असल्याचं नागरिकांनी सांगितलं.

किराडपुरा भागात गॅसचा स्फोट : शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास किराडपुरा भागातील मस्जिद जवळ अचानक स्फोट झाला. तिथं असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्यानं आवाज आला. लोकांनी धावपळ करत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी भंगार व्यावसायिक असलेल्या रिझवान पठाण यांच्या घराला आग लागलेली दिसून आली. घरात काही लोक अडकले होते, त्यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं. घरात अडकलेल्या काही जणांना नागरिकांनी बाहेर काढत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर राहिलेलं बचाव कार्य सुरू करण्यात आलं, यात पाच वर्षीय लहान मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींमध्ये रिझवान पठाण (वय 50), फैजान रिझवान पठाण (वय 12), शमीम पठाण, रेहान चांद शेख हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर यात एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून अधिक तपास केल्यावर सविस्तर माहिती मिळेल, अशी माहिती जीन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली आहे. या घटनेने शहर हादरले हळहळ व्यक्त होत आहे.

मदत मिळण्यास उशीर झाला : आग लागल्यावर मदत उशिरा मिळाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. स्फोट झाल्यावर आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र एक तास गाडी घटनास्थळी आली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तर जखमी लोकांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढलं, मात्र रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्यानं जखमींना रिक्षात पाठवावं लागलं, असं देखील स्थानिक म्हणाले. मात्र ज्या ठिकाणी आग लागली ती गल्ली अवघ्या पाच फुटाची असल्यानं जवळपास दोनशे फूट पाईप ओढून न्यावा लागला, असं अग्निशमन दलाच्या जवानानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. शॉर्टसर्किटनं घराला लागली आग; दोन सिलिंडरच्या स्फोटात पाच जणांचा होरपळून मृत्यू
  2. चेंबूर आणि भाईंदर परिसरात सिलेंडरचा स्फोट; 10 जण गंभीर जखमी
  3. गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; स्फोटात चार जण गंभीर, हादऱ्यानं 4 ते 5 घरं जमीनदोस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.