ETV Bharat / state

सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple - SATYANARAYAN TEMPLE

Satyanarayan Temple In Sawalapur : प्रत्येक गावात पुरातन मंदिरं आपल्याला आढळून येतात. मात्र, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सावळापूर या गावातील 'सत्यनारायण मूर्ती' (Satyanarayana Idol) ही अतिशय मनमोहक आणि लोभस आहे. या मूर्तीच्या एका हातात शंख, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात भव्य अशी गदा आहे. नजर खिळवून ठेवणाऱ्या अप्रतिम असणाऱ्या सत्यनारायण मूर्तीसंदर्भात' 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट पाहा आणि वाचा.

Satyanarayan Idol
सत्यनारायण मूर्ती सावळापूर अमरावती (ETV Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 6:39 PM IST

Updated : Jul 29, 2024, 6:50 PM IST

अमरावती Satyanarayan Temple In Sawalapur : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सावळापूर या गावात गुटगुटीत काळ्या दगडावर अतिशय सुबक नक्षीकाम असणारी 'सत्यनारायणाची मूर्ती' (Satyanarayana Idol) मंदिरात विराजमान आहे. 1861 साली ही मूर्ती गावातील अकोलकर यांच्या चारा ठेवण्यासाठी असणाऱ्या वाड्यात सापडली होती. त्यानंतर त्या वाड्यातच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज तो वाडा 'श्री सत्यनारायण मंदिर' म्हणून गावात ओळखला जातो. सावळापूर येथील सत्यनारायण मंदिरात अक्कलकोट येथून स्वामी समर्थ देखील दर्शनाकरिता आले होते, असं ग्रामस्थ सांगतात.

सत्यनारायण मूर्तीवर 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट (ETV BHARAT Reporter)

सत्यनारायणाच्या मूर्तीवर देवांगण : काळ्या दगडामध्ये कोरीव काम करून घडवण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, या मूर्तीला चार हात आहेत. एका हातात अतिशय सुंदर आणि भव्य असा शंख, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात भव्य अशी गदा आहे. चौथ्या हातात कमळाचे फूल होते. मात्र, खोदकामादरम्यान ते तुटले. यासह या मूर्तीवर मासोळी, घोडा, साप यासह काही मुर्त्या देखील आहेत. ही मूर्ती घडवताना मूर्तीकाराने अगदी हाताच्या आणि पायाच्या बोटांना देखील अतिशय रेखीव असा आकार दिला आहे. एकूणच सत्यनारायणाच्या मूर्तीवर संपूर्ण देवांगण कोरलं असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक नरेंद्र अकोलकर यांनी दिली.

शाळेतील गुरुजींना दिला दृष्टांत : 1861 मध्ये हिरूळ पूर्णा येथील रहिवासी असणारे तायडे गुरुजी सावळापूर या गावात शिक्षक म्हणून रुजू झाले होते. दरम्यान, त्यांच्या स्वप्नात सत्यनारायणाच्या मूर्तीने गावातील अकोलकर यांच्या गाई-म्हाशींसाठी असणाऱ्या वाड्यात मातीमध्ये मूर्ती पुरवल्याचा दृष्टांत दिला होता. तायडे गुरुजींच्या विनंतीवरून अकोलकर यांच्या वाड्यात खोदकाम केलं असता जमिनीत ही मूर्ती आढळून आली. मुस्लिम आक्रमण काळात ही मूर्ती लपवून ठेवण्यात आली असावी, अशी माहिती गावातील 83 वर्षीय गृहस्थ विठ्ठल अकोलकर यांनी दिली.

मूर्तीचा वाद पोहोचला न्यायालयात : "1861 मध्ये सावळापूर गावात सापडलेली अतिशय सुंदर अशी सत्यनारायणाची मूर्ती अमरावतीला नेण्याचा प्रयत्न झाला. गावकऱ्यांनी याला विरोध दर्शविला आणि प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने ग्रामस्थांची बाजू ग्राह्य धरून ज्या ठिकाणी मूर्ती सापडली त्याच ठिकाणी ती राहावी असा निर्णय दिला. यामुळंच सत्यनारायणाची मूर्ती आमच्याच वाड्यात विधिवत स्थापन करण्यात आली," असं विठ्ठल अकोलकर यांनी सांगितलं.

स्वामी समर्थ आले होते दर्शनाला : "सावळापूर येथील सत्यनारायणाच्या मंदिरात अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज आले होते. याबाबत आक्कोलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात तशी नोंद आहे. या मंदिरात सत्यनारायणाच्या दर्शनाकरिता दरवर्षी राजस्थानमधील अनेक भाविक येतात," अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक नरेंद्र अकोलकर यांनी दिली.

चोळ काळातील ही मूर्ती असल्याचा अंदाज : दक्षिण भारतात सातवाहन, वाकाटक, कदंब, कलचुरी, राजकोट अशी विविध घराणी झाली. कदंब राजवटी दरम्यान विशिष्ट बांधकामाला सुरुवात झाली. चालुक्यांच्या काळात कदंबांपेक्षाही भव्य बांधकामे झाली आणि चालुक्यांच्याच काळात मूर्तिकला देखील फोफावली. चालुक्यांच्या काळात विष्णूच्या मुर्त्या बनवण्याचा प्रघात सुरू झाला आणि विष्णूच्या अनेक अवतारांची पुढे मंदिर उभारण्यात आली. चालुक्यांच्या काळानंतर दक्षिणेत चोळघराणं उद्यायास आलं आणि चोळांच्या काळात मूर्तिकलेला मोठा वाव मिळाला. आजपासून साधारण चौदाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी दक्षिणेत असणाऱ्या चोळ राजवटीच्या काळात ही सत्यनारायणाची मूर्ती गुळगुळीत दगडात घडविण्यात आल्याचा अंदाज, इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  2. मेळघाटात 'सिपना पटेल'चा आहे अनोखा थाट, जाणून घ्या आदिवासी बांधव का करतात 'सिपना पटेल' वृक्षाची पूजा
  3. एकच कुटुंब असणारे गाव! मेळघाटातील घनदाट जंगलात पिली गावात एकच घर, पाहा व्हिडिओ

Last Updated : Jul 29, 2024, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.