पुणे : मराठा आरक्षणाचा लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल (31 ऑक्टोबर) दलित, मुस्लिम, मराठा समीकरण जुळलं असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. जरांगे पाटील येडा माणूस असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
हाकेही यादी जाहीर करणार : जरांगे पाटील यांनी मुस्लिम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून आता आपण बंजारा समाजाबरोबरच ओबीसी समाजाशीही चर्चा करणार असल्याचं सांगत नवं राजकीय समीकरण मांडलं. यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना विचारलं असता ते म्हणाले की, यात सहभागी झालेले आनंदराज आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला पाठवलं होतं. त्यांना ओबीसी आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मान्य आहे का? हे त्यांनी सांगावं. तसंच या विधनासभा निवडणुकीत जरांगे कुठलीही माणसं उभी करणार नसून ते 4 तारखेनंतर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतील. त्यांनी जर त्यांची यादी जाहीर केली, तर आम्ही देखील आमची यादी जाहीर करणार.
ओबीसी कुणाला मतदान करणार नाही? : "जरांगे पाटील जेव्हा त्यांचे उमेदवार जाहीर करतील, त्याच्या एक तासानंतर आम्ही देखील आमचे उमेदवार जाहीर करू. तसंच कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं आणि कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं नाही हे देखील आम्ही जाहीर करणार आहोत. राजेश टोपे, रोहित पवार, तान्हाजी सावंत, संदीपान भुमरे यांना आम्ही मतदान करणार नाही," असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं.
जरांगे हा येडा माणूस : "मनोज जरांगे पाटील यांना राज्याच्या राजकारणाचं ज्ञान शून्य असून तो काहीही बरगळत आहे. जरांगे हा येडा माणूस असून. ते विधानसभा निवडणुकीला कोणताही उमेदवार उभा करणार नाहीत. चार तारखेनंतर ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतील," अशी टीका हाके यांनी जरांगे पाटलांवर केली.
हेही वाचा