ETV Bharat / state

शिक्षकांपुढे पेचप्रसंग! परिक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना शिकवायचं की निवडणुकीची कामं करायची? - शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच काम

विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकांच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस आल्या आहेत. त्यावर आता विद्यार्थ्यांना शिकवावं की निवडणुकीचं काम कराव असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

BMC
मुंबई महापालिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 11:44 AM IST

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांची हालचाल प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याचं सिद्ध झालंय. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडून मुंबई महापालिकेतली शिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना आल्या आहेत. मुख्य शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक यांना (दि. 10 फेब्रुवारी)रोजी युद्ध पातळीवर निवडणुकीच्या कामासाठी बैठकीचा आदेश देण्यात आले आहेत. जे बैठकीस अनुपस्थित राहणार, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्यामुळे शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

मुलांना शिकवायचे की, निवडणुकीच्या कामात लागायचे? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होत आहे. आता काहीच दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना राजेश कंकाळ, राजू तडवी यांना युद्ध पातळीवर कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी काल सर्व शिक्षकांना तातडीची नोटीस पाठवून बैठकीला उपस्थित राहण्याचं सांगितलं होतं. परंतु, परीक्षा तोंडावर असल्यामुळे शिक्षकांमध्ये चिंता आहे. परीक्षा तोंडावर असताना मुलांना शिकवायचे की, निवडणुकीच्या कामात लागायचे? असा पेच निर्माण झाला आहे.

शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल : निवडणुकीच्या कामकाजाचं पत्र मुंबई महापालिकेकडून शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झालं. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांना पत्र आलं आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या कामाबाबत काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. यातील शिक्षकांना बैठकीस हजर राहण्याचं सांगण्यात आलं आहे. बैठकीस नाही आले तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून वगळा : शालेय मुलांच्या शेवटच्या सत्रातील घटक चाचणी परीक्षा आता सुरू आहेत. वार्षिक परीक्षा देखील आता लवकरच होणार आहेत. परिणामी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेच्या कामकाजामध्ये आहे. शिक्षकांची मागणी आहे. की लोकसभा निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळा. अन्यथा, विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारात जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस आणि शिस्त भंगाच्या कारवाईचा इशारा, यामुळे आम्ही मुख्याध्यापक शिक्षक संघटना निवडणुकीच्या सक्तीच्या कामाविरुद्ध बहिष्कार टाकणार आहोत. आम्ही प्रशासनाला याबाबत सांगू इच्छितो की शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून वगळा. मुलांच्या परीक्षेची तयारी करायची की प्रशासकीय काम करायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

1 बिहारमध्ये आज एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट, तेजस्वी 'खेळ' करणार की नितीश कुमार पुन्हा 'विश्वास' जिंकणार?

2 मोदी सरकारची मुत्सद्देगिरी यशस्वी, कतारच्या ताब्यातील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका

3 "दाढी हलकी समजू नका, काडी फिरवली तर लंका जळून जाईन"; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर तोफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.