ETV Bharat / state

काँग्रेसला न जुमानता उत्तर मुंबई ठाकरे गटाचा प्रचार सुरू, विनोद घोसाळकरांकडून प्रचाराची सूत्रे हाती - LOK SABHA ELECTION 2024 - LOK SABHA ELECTION 2024

North Mumbai Thackeray Group : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मात्र मतदारसंघांवर जोरदार दावा करत थेट प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. सांगली आणि उत्तर मुंबई या जागा काँग्रेस लढवणार असतानाच ठाकरे यांनी उमेदवार घोषित केले. उत्तर मुंबईत तर नाव घोषित होण्यापूर्वीच विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

North Mumbai Thackeray Group
ठाकरे गटाचा प्रचार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 6:01 PM IST

मुंबई North Mumbai Thackeray Group : महाविकास आघाडीतील सांगली आणि उत्तर मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे; मात्र सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर उत्तर मुंबईतून अद्याप उमेदवार घोषित झाला नसला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तर मुंबईच्या जागे संदर्भात बोलताना जर काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर आमच्याकडे उमेदवार तयार आहे. इतकेच केवळ वक्तव्य केले. त्यानंतर घोसाळकर यांनी थेट दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला सुरुवात केली. घोसाळकर यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बोट धरायला दिले तर गळा पकडतात : यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणाल्या की, ठाकरे गटाकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही. उत्तर मुंबईच्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असताना अशा पद्धतीनं थेट प्रचाराला सुरुवात करणं योग्य नाही. ठाकरे गटाला बोट पकडायला दिलं तर ते थेट गळाच पकडतात, अशा शब्दात म्हात्रे यांनी टीका केली आहे. यासंदर्भात पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा जिंकून आणायच्या आहेत की ठाकरे गटाला केवळ आपला बदला घ्यायचा आहे हे एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे.

सेना भवन परिसरात नगरसेवकही नाही : शिवसेना भवन परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक नगरसेवक निवडून आणला नाही. मात्र त्यांना दक्षिण मध्य मुंबईची जागा पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. मग शिवसेना कशाच्या आधारावर या जागांवर दावा सांगत आहे असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. उत्तर मुंबईतून यापूर्वी चंद्रकांत गोसालिया, गोविंदा आणि संजय निरुपम हे काँग्रेसचे नेते निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 चा अपवाद वगळता हा मतदार संघ ही काँग्रेसचाच मतदार संघ म्हणून ओळखला जातो. शिवसेना आजवर कधीही स्वतंत्रपणे निवडणुका लढली नाही. त्यामुळे त्यांची स्वतःची मतदार संख्या किती आहे याची नेमकी माहिती नाही त्यामुळे त्यांनी मुंबईच्या चार ते पाच जागांवर दावा करणे योग्य नसल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबई यापूर्वी सोडली होती : यापूर्वी काँग्रेसकडे दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा सारखा प्रबळ दावेदार असतानाही ती जागा आम्ही शिवसेनेला दिली होती. त्यामुळे शिवसेनेला मान दिला तर ते मानच पकडतात असंही म्हात्रे म्हणाल्या. उत्तर मुंबई हा काँग्रेसचा मतदार संघ आहे आणि या मतदारसंघातून काँग्रेसच्याच उमेदवाराला तिकीट मिळायला हवे यावर काँग्रेसचे कार्यकर्ते ठाम आहेत, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; जातनिहाय जनगणना, 50 टक्क्यांवर आरक्षण वाढीसाठी करणार घटनादुरुस्ती - Congress Party Releases Manifesto
  2. काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी; सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा सल्ला - Sanjay Raut
  3. विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.