ETV Bharat / state

निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्रीरामपूर शहरात दाखल : पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत - Nivruttinath Maharaj Palkhi

Nivruttinath Maharaj Palkh : निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्रीरामपूर शहरात दाखल झाली असून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. तसंच वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी पाण्यासह झुणका भाकरीचे स्टॉल लावण्यात आले होते.

Nivrutinath Maharaj Palkhi
निवृत्तीनाथ महाराज पालखी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 8:12 PM IST

श्रीरामपूर Nivruttinath Maharaj Palkh : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून आषाढी एकादशीनिमित्तानं पंढरपूरकडं निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज श्रीरामपूर शहरात दाखल झालीय. श्रीरामपूर शहरातील नोर्धन चौकात या पालखीचं श्रीरामपूरकरांनी स्वागत केलं. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी न चुकता त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला निघणारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी 20 जून रोजी त्र्यंबकेश्वरहून निघाली होती. आज या पालखीचा दहावा दिवस असून ही पालखी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात दाखल झाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात असणार आहे.

वारकऱ्यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

वारकऱ्यांसाठी स्टॉल : यंदा या पालखीत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीय आहे. पालखी आज श्रीरामपूर शहरात दाखल झाल्यानं श्रीरामपूर लोणी महामार्गावर ठिकठिकाणी श्रीरामपूरवासीयांनी पिण्याचं पाणी, बिस्कीटं, जेवण, झुणका भाकरीचे स्टॉल लावले आहेत. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून श्रीरामपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

18 जुलै रोजी पंढरपुरात दाखल : विठुरायाच्या ओढीनं दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथांची पालखी परंपरेनं गुरुवार, 20 जून रोजी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडं रवाना झाली आहे. निवृत्तीनाथांच्या दिंडी सोहळ्यात 50 हजार भाविक सहभागी झाले आहेत. पालखी अहमदनगरला पोहोचल्यानंतर संत निवृत्तीनाथांच्या दिंडीत अनेक लहान-मोठ्या पालख्या सहभागी होणार आहे. त्यानंतर साधारणत: 2 लाखांहून अधिक भाविक या पालखीत सहभागी होतील असं, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी अध्यक्ष कांचन जगताप यांनी सांगितलंय. साधारणपणे ही पालखी 18 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार असल्याचं त्या म्हणाल्या.

वारकऱ्यांच्या 75 टक्के मागण्या पूर्ण : राज्य सरकारनं यंदा वारकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या 75 टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत. निर्मल वारीसाठी शासनानं अडीच कोटी रुपये दिले आहेत. लहान-मोठ्या सर्व पालखींना 20 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्याचवेळी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या अध्यक्षा कांचन जगताप यांनी राज्य सरकारनं राज्यात गोहत्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचं म्हटलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut
  2. पावसाळी अधिवेशन 2024 : राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करणार : मुख्यमंत्री - Maharashtra Monsoon Session 2024
  3. मुंबई-नाशिक महामार्गावर खड्यांचं साम्राज: वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच - Traffic on Mumbai Nashik highway

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.