नांदेड Nana Patole On Nitish Kumar : इंडिया आघाडीला सोडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपासोबत गेले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. (Nitish Kumar) राजकीय फायद्यासाठी नितीश कुमार इकडे तिकडे जात असतात. पण, गेल्या 2014 पासून देशात आणि आपल्या राज्यात देखील अस्थिर राजकारण केलं जात आहे. राजकीय नीतिमत्तेला मातीमोल करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. (New CM of Bihar) आपल्या राज्यात देखील लोकांना विकत घेऊन भ्रष्ट सरकार स्थापन्यात आलं, असं नाना पटोले म्हणाले.
नितीश कुमार यांच्या पोटात 32 दात : बिहारच्या राजकारणात मोठा फेरबदल सुरू आहे. इंडिया आघाडीच्या सोबत असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सत्ताबद्दल करत भाजपा सोबत सरकार स्थापन करण्यात येतं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. मला लालुप्रसाद यांचं भाषण आठवत आहे. लोकांच्या तोंडात 32 दात असतात तर नितीश कुमार यांच्या पोटात 32 दात आहेत. नितीश कुमार हे नेहमी सत्तेसाठी इकडे-तिकडे करत असतात. 2014 पासून ते आतापर्यंत भाजपात नितिमत्ता राहिली नाही. या सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचं काम भाजपानं केलं आहे. त्यामुळे नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत. भाजपाला घरी पाठवण्याचा मानस लोकांनी बांधला आहे, असं नाना पटोले बोलले.
येत्या 30 तारखेला मविआची बैठक: लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मित्र पक्षासोबत चर्चा सुरू आहे. पुन्हा 30 तारखेला महाविकास आघाडी आणि घटक पक्षाची बैठक होणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी बोलणं सुरू आहे. 30 तारखेला होणाऱ्या बैठकीत वंचित प्रमुख बाळासाहेब आंबेडकर येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी येतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. 30 तारखेच्या बैठकीनंतर जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला ठरेल, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा: