नांदेड Ramesh Chennithala On Nitish Kumar : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत महाराष्ट्रासाठी फॉर्म्युला तयार होणार आहे. (India Alliance) यावर दोनदा चर्चा झाली आहे. लवकरच चर्चा पूर्ण करून निर्णय घेऊ. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलं असून ते सकारात्मक भूमिका बजावत आहेत. उद्याच्या चर्चेनंतर भारत आघाडीत महाराष्ट्राचा फॉर्म्युला तयार होणार आहे, असं काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेनीथला यांनी सांगितलं.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी: नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी आणि रचना केली जात आहे. आज काँग्रेसने महिलांचा फायदा घेत निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात केली आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी सुरू झाली आहे. येथे पात्र उमेदवार देण्यात येणार असून नांदेड लोकसभेला जागविण्याचा प्रयत्न करणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाजपा नेत्यांचे वक्तव्य आले आहे की, ही यात्रा भारत तोडो यात्रा आहे. भाजपा भारत तोडण्याचं काम करत आहे. भारताला एकसंघ करण्याचं काम करणाऱ्या भारतीयांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींनी त्यांची दुसरी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, असं रमेश चेनीथला यांनी सांगितलंं.
भाजपाला राहुल गांधींची भीती वाटते : भाजपाला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची भीती वाटते असं सगळे बोलत आहेत. अधिकाधिक लोक या यात्रेला पसंती देत आहेत आणि लाखोंच्या संख्येनं या यात्रेत सामील होत आहेत, त्यामुळेच भाजपा राहुल गांधींना घाबरत आहे आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. कर्नाटकात सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकणार. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार. त्यांना दिलेल्या हमीमुळे जनता खूश आहे, असा अंदाज देखील काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेनीथला यांनी वर्तविला.
नितीश कुमारांचं सत्तेसाठी इकडून तिकडे: नितीश कुमार यांच्यावर नाना पटोले यांनीही वक्तव्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. यावर महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार हे नेहमी सत्तेसाठी इकडे-तिकडे करत असतात. 2024 पासून राज्यात अस्थिर राजकारण सुरू आहे, असंही ते म्हणाले.
नितीश कुमार यांच्या पोटात 32 दात : बिहारच्या राजकारणात मोठा फेरबदल सुरू आहे. इंडिया आघाडीच्या सोबत असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सत्ताबद्दल करत भाजपा सोबत सरकार स्थापन करण्यात येतं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. मला लालुप्रसाद यांचं भाषण आठवत आहे. लोकांच्या तोंडात 32 दात असतात तर नितीश कुमार यांच्या पोटात 32 दात आहेत. नितीश कुमार हे नेहमी सत्तेसाठी इकडे-तिकडे करत असतात. 2014 पासून ते आतापर्यंत भाजपात नितिमत्ता राहिली नाही. या सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचं काम भाजपानं केलं आहे. त्यामुळे नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत. भाजपाला घरी पाठवण्याचा मानस लोकांनी बांधला आहे, असं नाना पटोले बोलले.
हेही वाचा: