ETV Bharat / state

मुनगंटीवारांना निवडून आणा विकासाचा पॉवरफूल शिलाजीत देऊ; नितीन गडकरी यांचं वक्तव्य - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Nitin Gadkari Appeal : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (6 एप्रिल) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जिंकवून देण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. मोदी, मी आणि मुनगंटीवार मिळून विकासाचे पावरफूल शिलाजीत देऊ, असंही ते म्हणाले.

Nitin Gadkari Appeal
नितीन गडकरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 8:14 PM IST

नितीन गडकरी हे सुधीर मुनगंटीवारांना जिंकवून देण्याचं आवाहन करताना

चंद्रपूर Nitin Gadkari Appeal : सुधीर मुनगंटीवार सारख्या नेत्याला खासदार म्हणून निवडून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी आणि मुनगंटीवार मिळून तीन इंजिनची ताकद होईल. मग विकासाचं असं पॉवरफुल शिलाजीत देऊ की, जोरात काम होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. गडकरी आज राजुरा शहरात बोलत होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ते आले होते.

तर राजुऱ्याचे इंधन विमानात जाईल : मी फोकनाड बोलणारा नेता नाही. जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. आता धानाच्या तणसापासून इथेनाल तयार करण्यात येत आहे. राजुरा येथे विमानतळ तर होणारच; पण हे सांगतो की, त्या विमानात राजुरा येथील शेतकऱ्यांनी तयार केलेलं इथेनॉल असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी पण शरद जोशी यांचा अनुयायी : शरद जोशी यांचा मीसुद्धा एक प्रामाणिक अनुयायी आहे. त्यांच्या विचारांच्या आधारावर एक जीवनदृष्टी तयार केली आहे. साखरेचा भाव ब्राजीलमध्ये ठरतो. मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो. तेलाचा भाव मलेशियात ठरत असतो. त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये क्राप पॅटर्नची विचारपूर्वक निवड केली पाहिजे. धानाच्या तनसापासून इंधन तयार करणार. जेव्हा राजुऱ्यात विमाने उतरतील तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन त्या विमानात जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही. मी फोकनाड बोलणारा नेता नाही. "जो करता हूॅं, वही बोलता हूॅं" असं नितीन गडकरी म्हणाले. ते राजुरा येथील जाहीर सभेत बोलत होते.

5 लाखांचं मताधिक्य द्या : नितीन गडकरी यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर म्हणाले, माझे कार्यकर्तेच मला लढण्याची ऊर्जा देतात. गेल्या दहा वर्षांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची कामं नागपूर लोकसभा मतदारसंघात झालीत. पण या कामांचं श्रेय माझं किंवा देवेंद्रजींचं नसून हजारो कार्यकर्त्यांचं आहे. निवडणुकीत विजय निश्चित आहे. 75 टक्के मतदानासह 5 लाख मतांनी मला निवडून द्या असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. "बारामतीची लढाई ही शरद पवार, अजित पवारांची नाही, तर..."; बारामतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnvis
  2. वकिलांच्या 'या' कृतीवर सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले 'हे' विसरु नका - CJI DY Chandrachud
  3. शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकर गरजले - Sharad Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.