ठाणे Niranjan Davkhare On Ganpat Gaikwad : शुक्रवारी हिल लाईन पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवकावर गोळीबार केला. मुख्य म्हणजे हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्ये घडल्याने राजकीय वर्तुळात वेगळे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
शरीरातून काढल्या सहा गोळ्या : रात्री उशिरा महेश गायकवाड यांना ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर डॉक्टरांचे एक विशेष पथकामार्फत शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रिया दरम्यान महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या, तर साथीदार राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात आल्या. एकूण 10 राऊंड फायर करण्यात आली होती. त्यातील सहा राउंड हे महेश गायकवाड यांना लागले, तर दोन राहुल पाटील लागल्या आणि दोन गोळ्या ह्या चुकल्या असल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
असा घडला प्रकार : ज्यावेळी महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं त्याच वेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनाबाहेर आरडाओरड आणि गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाला. हा गोंधळ थांबवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाहेर गेले असता हा संपूर्ण प्रकार त्या दालनामध्ये घडला. ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोळ्यांचा आवाज ऐकून आतमध्ये गेले त्यावेळेस गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या छातीवर बसून बंदुकीने हल्ला करत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सीताफिने गणपत गायकवाड यांच्या हातातून परवानाधारक पिस्तूल हिसकावून घेतली. घडलेल्या प्रकार अत्यंत धक्कादायक असून विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
निरंजन डावखरे यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होणार का? तपासाअंती काय नेमकं समोर येतंय, हा हल्ला पूर्वनियोजित होता का? या संदर्भात देखील चौकशी आता पोलीस करत आहेत. घडल्या प्रकारानंतर गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी सध्या गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. तर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील कळवा पोलीस स्थानकात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे.
महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक : महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. परंतु त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. तर महेश गायकवाड यांचे साथीदार राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्या बाहेर काढल्या असून राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.
ठाण्यात पोलीस छावणीचे स्वरूप : शिंदे गट आणि भाजपामधील वाद उफाळला असून कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ज्या रुग्णालयात महेश गायकवाड यांना दाखल केलं आहे त्या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्थानकात हजर केल्यानंतर तेथेही बंदोबस्त करण्यात आला आहे.
निरंजन डावखरे यांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव : गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर आमदार निरंजन डावखरे हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र वैयक्तिक कारणास्तव पोलीस ठाण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाचा खंडन करत असं कोणतीही बाब निदर्शनात आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर भाजपाचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील असंही निरंजन डावखरे यांनी सांगितलंय.
हेही वाचा -