ETV Bharat / state

जेएनपीए रोडवर रिक्षाला ट्रेलरची धडक, एक ठार तर दोन जखमी; नागरिकांचा रास्ता रोको - Rickshaw trailer Accident - RICKSHAW TRAILER ACCIDENT

Rickshaw trailer Accident : नवी मुंबईजवळीला जेएनपीए रोडवर रिक्षाला ट्रेलरनं धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. उरण परिसरात वारंवार अपघात होत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ संतप्त झालेत.

Rickshaw trailer Accident
जेएनपीए रोडवर अपघात (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 9:49 PM IST

नवी मुंबई Rickshaw trailer Accident : करळ फाटा ते जेएनपीए या मार्गावर नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. असे असले तरी ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळं उरण परिसरात अपघातांचं प्रमाण कमी झालेलं दिसंत नाही. आज सकाळी 7 च्या सुमारास जेएनपीए रोडवरील न्हावा शेवा कस्टम कार्यालयाजवळील रस्त्यावर रिक्षाला ट्रेलरनं धडक दिली. या अपघात एकाला जीव गमावाला लागला. तर दोन जण जखमी झाले आहेत.

रास्ता रोको करताना नागरिक (Etv Bharat Reporter)

अशी घडली घटना : सविस्तर माहिती अशी की, रात्रपाळी करून भरत ठाकूर (53) केळवणे, भोम येथील सचीन म्हात्रे (40), आकाश चौगुले (30) हे तिघे रिक्षातून घरी जात होते. ते पीयुबी जवळ आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरनं रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये भरत ठाकूर यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेत सचिन म्हात्रे तसंच आकाश चौगुले गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दिपक दाभाडे यांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. त्यानंतर तिघांनाही जेएनपीए रुग्णालायत नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी भरत ठाकूर यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेतील जखमी सचिन म्हात्रे तसंच आकाश चौगुले यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आलंय.

  • ग्रामस्थांचा रास्ता रोको : वारंवार होणाऱ्या अपघातांमुळं संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत कडक कारवाईची मागणी केलीय. तसंच त्यांनी जेएनपीएकडं जाणारी वाहतूक रोखून धरली. भरत ठाकूर यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.