ETV Bharat / state

आता शाळेत शिकवणार 'सेलिब्रिटी', कसं असेल नवं शैक्षणिक धोरण? शिक्षणमंत्री केसरकरांनी दिली 'ही' माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 6:59 AM IST

New Education Policy : शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी राज्य सरकारकडून विविघ उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातच आता नव्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितलंय.

New Education Policy
New Education Policy

मुंबई New Education Policy : राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमध्ये आता विद्यार्थी आनंदात शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांना सेलिब्रिटीच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवलं जाणार आहे. तसंच 'हॅप्पी सॅटर्डे' ही नवी संकल्पना सुरु करणार असल्याची माहिती, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

शाळाबाह्य मुलांसाठी विविध उपक्रम : राज्य सरकारच्या वतीनं शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शालेय अभ्यासक्रम हा मुलांना आवडणारा आणि मनोरंजनातून शिक्षण देणारा असावा, असं नवं धोरण राज्य सरकार राबवण्याच्या विचारात आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राबवलं जाणार असल्याची माहिती, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

पूर्व प्राथमिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश : जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून आता पूर्व प्राथमिक वर्ग सुरु करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. हे वर्ग विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण देईल, तसे अभ्यासक्रम आम्ही सुरु करत आहोत. तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातच व्यावसायिक अथवा उपजीविकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण दिलं जाणार असल्याचही शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितलंय. तसंच मुलांना हॉर्टिकल्चरचं ज्ञान शालेय जीवनातच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी परसबाग कशी फुलवावी किंवा टेरेसवर कशी बाग करता येऊ शकेल, याबाबतचं ज्ञानही विद्यार्थ्यांना देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षणाचा दर्जा सुधारणार : राज्यातील शिक्षणाच्या दर्जाबाबत बोलताना केसरकर म्हणाले, "राज्यातील शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांची तयारी कशी करता येईल आणि त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण कसं देता येईल? याचाही विचार या धोरणात करण्यात आलाय." तसंच स्काऊट आणि गाईड हे सर्व शाळांमध्ये सुरु करण्यात येणार आहे या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जाणार आहेत, असंही केसरकर यांनी सांगितलंय.

सेलिब्रिटी स्कूल आणि हॅप्पी सॅटर्डे : राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणात 'सेलिब्रिटी स्कूल' आणि 'हॅप्पी सॅटर्डे' यांचा समावेश करण्यात येणार आहे. सेलिब्रिटी स्कूल म्हणजे कोणतीही नामवंत सेलिब्रिटी व्यक्ती ही ऑनलाईन विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचं शिक्षण देणार आहे. त्यात संगीत, अभिनय किंवा गायन असेल. या शिक्षणानंतर मुलांच्या याबाबतीतल्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. त्यामुळं मुलांमध्ये या कलागुणांचा विकास होईल. शिवाय खिलाडू वृत्तीही वाढीला लागेल, असंही केसरकर म्हणाले. तसंच शाळांमध्ये हॅप्पी सॅटर्डे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या दिवशी मुलांना मनोरंजन आणि वाचन याची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वाचन चळवळ अधिक सक्षम करण्याचा सरकारचा विचार असल्याचंही केसरकर यांनी यावेळी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Jagdeep Dhankhad On Education Policy : नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर ठरणार : उपराष्ट्रपती
  2. शैक्षणिक धोरण नेमकं आणि ठोस असायला हवं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.