बीड NEET Paper Leak Beed Connection : देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील दोन संशयित तपासात समोर आले असून त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयित म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसनं बोलावून घेतलं. हे दोघंही लातूरच्या एका आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पहात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीवरुन बीड जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी काही नावं पुढं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शिक्षणं क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
लातूरच्या आरोपीचे सब एजन्ट : नीट प्रकरणात बीड कनेक्शन पुढ आल्यानं मोठी खळबळ उडाली. हे दोघंही लातूरच्या आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पाहत होते. त्यांना नांदेड एटीएसनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एक संशयित हा बीडचा असून दुसरा संशयित हा माजलगावचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या प्रकरणी लातूर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील सात पालकांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बीड जिल्ह्यातील शिक्षकांची मुलांचा समावेश : बीड जिल्ह्यातील 7 पालकांना लातूर इथं चौकशीला बोलावण्यात आलं होतं. हे सातही पालक शिक्षक आहेत. या सर्वांची मुलं खासगी क्लाससाठी लातुरात वास्तव्यास आहेत. नीट परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवून जलील पठाण, संजय जाधव यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घेतले. मात्र विद्यार्थ्यांना तितके गुण मिळाले नसल्याचं चौकशी दरम्यान पालकांनी सांगितलं. पोलिसांनी चौकशीनंतर या बीड जिल्ह्यातील पालकांना सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :