मुंबई/लातूर- NEET Exam Maharashtra Connection : नीट पेपर लीक प्रकरणी नांदेड एटीएसनं लातू मधील दोन शिक्षकांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक लातूर येथे तर दुसरा सोलापूर जिल्हापरिषद शाळेत कार्यरत असल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही शिक्षकांची नांदेड एटीएसनं बराच वेळ चौकशी केली. त्यानंतर दोघांनाही सोडण्यात आलं. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज भासल्यास या दोन्ही शिक्षकांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते.
लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस : मिळालेल्या प्रशासकीय माहितीनुसार, लातूरमध्ये खासगी कोचिंग चालवणाऱ्या दोन शिक्षकांना एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन शिक्षकांची नावं आहेत. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. जलील पठाण हे लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवतात.
...त्यामुळं आला संशय : नीट परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये येतात. याचाच फायदा घेत लातूरमध्ये नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं रॅकेट सुरू असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला. त्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशीची चक्रे फिरवली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एटीएसच्या पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून शनिवारी (22 जून) रात्री दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं. नांदेड एटीएस पथकानं या दोन शिक्षकांना लातूर येथून ताब्यात घेतलं. त्यांची दीर्घकाळ चौकशी केली. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नीट पेपर लीक प्रकरणात दोन्ही शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे.
हेही वाचा -
- नीट परीक्षेचा घोळ थांबेना : पेपर फुटीसह शिक्षण माफियांसमोर पंतप्रधान मोदी हतबल झालेत, विरोधकांचा हल्लाबोल - NEET PG Exam Postponed
- पेपर लीक प्रकरणी NTA चे महासंचालक सुबोध सिंग यांची हकालपट्टी, आतापर्यंत 19 जणांना अटक - NEET Paper Leak Case
- पेपर फुटला तर आता खैर नाही, होऊ शकतो १ कोटी रुपयांचा दंड, १० वर्षे तुरुंगवास; पेपर लीक विरोधी कायदा लागू - Anti Paper Leak Act