ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंची 'एनडीए' सरकारबाबत मोठी भविष्यवाणी; निवडणूक आयोगावरही हल्लाबोल - Aaditya Thackeray On NDA - AADITYA THACKERAY ON NDA

Aaditya Thackeray On NDA : मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या मतदारसंघात मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. याप्रकरणी वायकर यांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Aaditya Thackeray On NDA Gov
आदित्य ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 6:11 PM IST

मुंबई Aaditya Thackeray On NDA : लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'ला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात सरकार स्थापन झालं. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एनडीएमध्ये सहभागी आहेत. मात्र, एनडीए आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनीही केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं. "काही महिन्यांत दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो," असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केलं. यापूर्वी देखील खासदार संजय राऊत यांनी देखील एनडीए आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा केला होता.

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)

काय म्हणाले आदित्य ठाकरे? : "आम्ही पाहिलं की इलॉन मस्क यांनी देखील ईव्हीएमबद्दल ट्विट केलं होतं. तसंच, आपण सर्वजण ईव्हीएमबद्दल बोलत आहोत. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात गोंधळाची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगानं तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. दुसरी गोष्ट म्हणजे, शिंदे गटातील काही लोक फोन घेऊन मतमोजणी केद्रात उभे होते. त्यांच्या फोनवरही एक ॲप होतं. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर अशा लोकांना तुम्ही मंत्रिपदाची शपथ कशी देता?," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. "एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी वायकरांवर निशाणा साधला.

'ईव्हीएम'वर विश्वास नाही : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादात सापडला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. "लोक भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज होते. त्यामुळं लोकांनी भाजपाला 240 वर आणलं आहे. जगभरात ईव्हीएमचा वापर केला जात नाही. इलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानावर विश्वास असूनही त्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. तुम्ही तुमच्या फोनवरून ओटीपीनं ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकतं. या निवडणुकीत आम्ही फक्त सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केलीय."

दिल्लीत वेगळा खेळ होणार : "भाजपात एकवाक्यता नाही. एक 400 पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरा काहीतरी अधिक बोलतो. आता निवडणूक संपली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. येत्या काही महिन्यांत दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो, याची मला खात्री आहे. लोकांवर हल्ले करणे, धमकावणे हे भाजपाचं राजकारण आहे. भाजपात एकवाक्यता नाही," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

'हे' वाचलंत का :

  1. मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा, लोकसभेतील खराब कामगिरीनंतर काय होणार बदल? - Yogi Adityanath meet Mohan Bhagwat
  2. नरेंद्र मोदी यांची तिसरी पंतप्रधान पदाची कारकीर्द खडतर; एनडीएतील घटक पक्षांना गृहित धरून चालणार नाही - Brand Modi Faces Turbulence
  3. अजित पवार भाजपासाठी 'नाकापेक्षा मोती जड'; पवारांना बाजूला कसं सारायचं? भाजपासमोर प्रश्न - Ajit Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.