ETV Bharat / state

...अन् जितेंद्र आव्हाडांवर त्यांचाच नाराज कार्यकर्ता संतापला; भर रस्त्यात थांबवून केलं असं काही

युसुफ शेख नावाच्या कार्यकर्त्याने कार्य अहवालामध्ये फोटो का टाकला नाही? असे विचारत राग व्यक्त केलाय. युसुफ शेख हे पवार गटातील महाराष्ट्र अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष आहेत.

yusuf sheikh
युसुफ शेख (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

ठाणे: निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना सांभाळणं किती कठीण असतं, त्याचा प्रत्यय जितेंद्र आव्हाडांना आलाय. कार्य अहवालात फोटो नसल्यामुळे एक कार्यकर्ता प्रचंड संतापला अन् आपल्या नेत्याला भिडलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचीच कशी अडचण झालीय हे मुंब्य्रात पाहायला मिळतंय. खरं तर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटातील मोठं नाव आहे. मुंब्रा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केलाय. परंतु आता त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना घरचा आहेर दिलाय. युसुफ शेख नावाच्या मुंबईतील एका कार्यकर्त्याने कार्य अहवालामध्ये माझा फोटो का टाकला नाही? असा प्रश्न विचारत आपला राग व्यक्त केलाय. युसुफ शेख हे पवार गटातील महाराष्ट्र अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष आहेत.

रस्त्यात गाठून जाब विचारला: असं असताना मुस्लिमबहुल समजलं जाणाऱ्या मुंब्य्रामध्ये त्यांचा फोटो न टाकल्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी चक्क आव्हाडांना रस्त्यात गाठून याचा जाब विचारला. राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी लागलीच महापालिका निवडणुकीत युसुफ शेख यांच्या मुलीला महापालिकेचा तिकीट देणार असल्याचं सांगत हा राग शांत करण्याचा प्रयत्न केलाय.

जितेंद्र आव्हाड यांची अडचण : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या नाराजीनं जितेंद्र आव्हाडांच्या नाकीनऊ आलंय, कारण विधानसभेची निवडणूक ही त्यांच्याच जवळच्या समजला जाणाऱ्या शिष्यासोबत असल्यामुळे आव्हाडदेखील धावपळ करताना दिसताहेत. जितेंद्र आव्हाड यांचे खंदेसमर्थक समजले जाणारे नजीब मुल्ला हे आज आपला उमेदवारी अर्ज भरीत आहेत आणि अशा वेळी झालेला हा प्रकार आव्हाडांनी आश्वासन देत शांत केलाय.

आव्हाडांबद्दल नाराजी नाही: माझा राग हा जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत नसून त्यांच्या एका कार्यकर्त्यांसोबत आहे, त्यांची वर्तणूक आम्हा कार्यकर्त्यांना आवडत नाही, असे सांगत युसुफ शेख यांनी कार्यकर्ता आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या.

कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू आणि शिष्य आमने-सामने : आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक नजीब मुल्ला यांची थेट लढत कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार तयारी सुरू झालीय. कळवा मुंब्रा मतदारसंघामधील ही लढाई गुरू शिष्यमध्ये असली तरी, एकेकाळी हे गुरू शिष्य एका ताटात जेवले होते. आता याच शिष्याने गुरू म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलंय.

हेही वाचाः

धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती

कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू शिष्याची लढाई; जितेंद्र आव्हाडांना मिळणार मोठं आव्हान?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.