ETV Bharat / state

अजित पवारांचे आमदार करणार घरवापसी ? शरदचंद्र पवार गटाचा सावध पवित्रा, जयंत पाटलांनी केलं मोठ वक्तव्य - Lok Sabha Election Result 2024

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षातील 19 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. मात्र शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत पक्षानं सावध पवित्रा घेतल्याचं स्पष्ट केलं.

Lok Sabha Election Result 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 6:54 AM IST

Updated : Jun 7, 2024, 9:53 AM IST

शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील (Reporter)

मुंबई Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची ओळख व्हावी, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सर्व आमदारांना मुंबईत प्रसार माध्यमांसमोर ओळख करून दिली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या सर्व खासदारांचं स्वागत केलं. खासदार अमोल कोल्हे, अमर काळे, बाळ्यामामा म्हात्रे, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे आणि धैर्यशील मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "राज्यातील सर्व जनतेनं पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर विश्वास दाखवला. आम्ही केवळ दहा जागा लढवल्या होत्या. त्यापैकी आठ जागा आम्ही जिंकल्या आहेत आणि एक जागा चिन्हाच्या गोंधळामुळे गमावली आहे."

चिन्ह गोंधळामुळे तीन जागांवर फटका : "राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे. तर पिपाणी या निवडणूक चिन्हाला सुद्धा तुतारी असंच म्हटलं जाते. त्यामुळे मतदारांचा अनेक मतदारसंघांमध्ये गोंधळ झाला. यामध्ये बीड मतदार संघात पिपाणीला 54 हजार, भिवंडी मतदार संघात एक लाख तर सातारा मतदारसंघात 32 हजार मतं मिळाली. यामुळे आम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसला. आम्हाला सातारा येथील शिंदे यांची जागा गमवावी लागली. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडं जाणार आहोत. यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे," असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील जनता सरकारला कंटाळली : "राज्यातील जनता सरकारला कंटाळली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकता येणार आहेत. कारण राज्यातील जनता केंद्राच्या सरकार पेक्षा राज्य सरकारवर अधिक नाराज असल्याचे विविध सर्वेमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आमच्या अधिक जागा येतील याबाबत काही शंका नाही," असंही पाटील म्हणाले.

घर वापसीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय : आमदार रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत अजित पवार गटाचे 19 आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, "याबाबत मी अद्याप काहीही बोलणार नाही. राज्यातील जनतेनं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कौल दिला. त्यामुळे आम्ही जनतेच्या मताचा आदर करतो. आता आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे," असं सांगून त्यांनी परत येणाऱ्या आमदारांबाबत सूचक विधान केलं. तसेच "यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, त्याबाबत अद्याप काहीही निश्चित नाही किंवा चर्चाही नाही," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत, अजित पवारांचा दावा; म्हणाले, पराभवाची जबाबदारी... - Ajit Pawar on Lok Sabha Results
  2. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांचं आमदारांसोबत 'मंथन'; तर शिंदेंकडून नवनिर्वाचित खासदारांना 'स्नेहभोजन' - Lok Sabha Result
  3. भाजपच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू, महायुतीच्या पराभवाला नेमकं जबाबदार कोण? - Lok Sabha elections

Last Updated : Jun 7, 2024, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.