ETV Bharat / state

तीन दिवसांचा मेगाब्लॉक मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसची रेल्वेकडे मागणी - Mumbai Railway Mega Block

Mumbai Railway Mega Block : मुंबईतील रेल्वे फलाटांच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं (Central Railway) तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केलाय. यामुळं उपनगरीय मार्गावरील ९३० फेऱ्या रद्द होणार असून ३३ लाख उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच मेगाब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आज सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केलं.

Mumbai Railway Mega Block
अँड अमोल मातेले (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 8:23 PM IST

मुंबई Mumbai Railway Mega Block : मध्य रेल्वेनं (Central Railway) उपनगरीय रेल्वे सेवेच्या वाहतूकीत गुरूवारी मध्यरात्रीपासून सुमारे ६३ तासांचा मेगाब्लॉक घोषित केलाय. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं २ जूनपर्यंत ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केलाय. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी ३० आणि ३१ मेच्या मध्यरात्री ते २ जूनच्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. याचा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल ३३ लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरचदंद्र पवार पक्षाचे मुंबई युवाअध्यक्ष अमोल मातेले यांनी आज सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात जोरदार आंदोलन केलं.

प्रतिक्रिया देताना अँड अमोल मातेले (ETV BHARAT Reporter)

आठवडाभर आधी सुचना देणे आवश्यक : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं. मात्र, ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घोषणाबाजी करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

मध्य रेल्वे प्रशासनाशी चर्चा : मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी. बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था, मासिक पासधारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसनं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडं केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. मध्य रेल्वेचा दोन दिवसीय मेगाब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक? - Central Railway Mega Block
  2. उन्हाळी सुट्टीत गावाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा मगच घराबाहेर पडा - Train Schedule
  3. बोरिवली-भाईंदरदरम्यान आज मेगाब्लॉक, वाचा आजचं रेल्वेचं वेळापत्रक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.