मुंबई Ajit Pawar NCP Manifesto : लोकसभा निवडणुकी निमित्ताने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नमूद करण्यात आलं असून जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरणार असल्याचेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरनामा जाहीर केला.
राष्ट्रवादी संकल्पनेवर आधारित जाहीरनामा : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रासाठी, राष्ट्रवादी अशा संकल्पनेवर हा जाहीरनामा आधारित आहे. दिलीप वळसे पाटील यांनी चांगल्या प्रकारे जाहीरनामा तयार केला. राज्यातील विकासाला चालना देणारा जाहीरनामा म्हणता येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. अजित पवार यांनी इंडिया आघाडीवर निशाना साधला. विरोधी बाकावर असा कोणीही नाही जो मोदी यांच्या समोर उभा राहील. पहिल्या टप्प्यात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली; मात्र त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरली. याला कारण तेथील तीव्र ऊन आणि मतदार यादीत नाव नाही.
'या' नव्या योजनेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याविषयी मागणी केलीय. त्याकरिता आम्ही पक्ष म्हणून काम करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत पक्षाने आपली भूमिका जाहीरनाम्यात स्पष्ट केली असून केंद्र सरकारसोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. भारत देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे, अशी भूमिका पक्षाची आहे. पीएम ग्राम सडक योजनेच्या पार्श्वभूमीवर पीएम शेत-शिवार-पाणंद रस्ता या नव्या योजनेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असेल. भाजपाच्या 'सबका का साथ, सबका विकास' मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देत सहभागी झालो आहे, असं अजित पवार म्हणाले.
काँग्रेस आघाडी धर्म पाळत नाही - प्रफुल पटेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रफुल पटेल म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षासोबत सत्तेत होतो. मात्र, त्याचा फटका आम्हाला देखील बसला. दिवंगत बॅ. अंतुले यांच्या बाबत देखील तसेच घडल्या बाबतच्या चर्चा झाल्या आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बॅ. अंतूले यांना बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने कायम आमच्या पक्षावर अन्याय केला आहे. काँग्रेस पक्ष आघाडी धर्म पाळायचे काम करत नसल्याचा आरोप प्रफुल पटेल यांनी केला. मोदी यांच्या विरोधासाठी विरोधक एकत्र आले आहेत. शिवसेनेला आम्ही कायम शत्रू मानलं होत. बाळासाहेब ठाकरे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विरोधात बोलत होते. शिवसेनेच्या भूमिकेविरोधात असताना त्यावेळी त्यांच्या सोबत गेलो तर आता आमच्या पक्षाची भूमिका आणि तत्त्व साबूत ठेवून सरकार सोबत गेलो आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे :
1) शेतकऱ्यांना किमान आधार मूल्याची (MSP) जपणूक करणार
2) कृषी पिक विम्याची व्याप्ती वाढवणार
3) जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरणार
4) वर्षाला मिळणाऱ्या १२ हजार रुपयात वाढ करणार
5) मुद्रा योजनेची मर्यादा १० लाखावरून २० लाखावर नेणार
6) राज्याला कौशल्य विकासाची राजधानी करणार
7) जातनिहाय जनगणना करणार
8) उर्दू शाळांना सेमी इंग्रजी शाळांचा दर्जा देणार
9) कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या मानधानात वाढ करणार, २० हजार मानधन देणार
10) आईचे नाव लपण्यासाठी सक्ती करणार
11) ३३ टक्के महिला आरक्षण
12) लेक लाडकी योजनेची व्याप्ती वाढवणार
13) वर्किंग वुमेन होस्टल उभारणार
14) पेपर फुटीबाबत कठोर कायदा करणार
15) ६० वर्षांवरील नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत
16) ७० वर्षांवरील नागरिकांना 'आयुषमान भारत'चा लाभ देणार
17) बिरसा मुंडा जलसंधारण योजना राबवणार
हेही वाचा :