ETV Bharat / state

'असे खुंखार आम्ही घराबाहेर पाळतो', नवनीत राणा यांचं ओवैसींना सडेतोड प्रत्युत्तर - Navneet Rana Vs Asaduddin Owaisi - NAVNEET RANA VS ASADUDDIN OWAISI

Navneet Rana Vs Asaduddin Owaisi Controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ओवैसींं बंधूंचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. आम्ही ओवैसींना मोजत नाही. असे खुंखार आम्ही घराबाहेर पाळतो, अशा टिखट शद्बात त्यांनी ओवैसींवर निशाना साधलाय. तसंच मी काही दिवसात हैद्राबादला येणार आहे, त्यांच्या दम असेल, तर त्यांनी थांबवून दाखवावं, असं आव्हान देखील त्यानी ओवैसींना दिलय.

Navneet Rana Vs Asaduddin Owaisi Controversy
नवनीत राणा विरुद्ध असदुद्दीन ओवेसी वाद (ETV Bharat Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 10:52 PM IST

Updated : May 11, 2024, 10:58 PM IST

छत्रपती संभाजीनगर Navneet Rana Vs Asaduddin Owaisi Controversy : AIMIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) तसंच नवनीत राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत चाललं आहे. आम्ही खुंखार आहे, असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं होतं. त्यावर नवणीत राणा यांनी तिखट शद्बात प्रतिक्रिया दिली आहे. 'अशा खुंखाराना छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे आम्ही मोजत नाही. आशांना आम्ही घरात पाळतो. तुम्ही समजून जा घरात कुणाला पाळतात, अशी टीका नवनीत राणा यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. अकबर ओवैसी सारख्या तोफांना आम्ही घराबाहेर ठेवतो, अशी मिश्किल टीका नवनीत राणा यांनी केली.

काँग्रेस, एमआयएमचं रक्त एकच : एमआयएम, काँग्रेसचं रक्त एकच आहे. हैद्राबादमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळंच गुन्हा दखल करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात सरकार असताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. ओवैसींनी हेट स्पीच देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल होतो. मी यापूर्वी सांगितलं होतं, मी मुंबईला हनुमान चालीसा पठणासाठी जाणार आहे. आता पुन्हा सांगितलं मी हैदराबादला येणार आहे. ज्याच्यात दम असेल त्यांनी रोखून दाखवा, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

या औरंगजेबाच्या अवलाद आहेत : एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या औरंगजेबाच्या अवलादीकडे मी जास्त लक्ष देत नाही. संभाजीनगरच्या जनतेला माहिती आहे. पाच वर्षे जो डाग लागलेला आहे, यावेळेस आम्ही डाग लागू देणार नाही. त्यांनी मला छटाकभर म्हणाले, 140 कोटी जनतेमध्ये ते फक्त 15 - 20 कोटी आहेत. ते आम्हाला दम देत आहेत, आम्ही दम सहन करणार नाही. हा माझा इशारा समजा किंवा जे समजायचं ते समजा. हैदराबादला पाकिस्तान होऊ देणार नाही, असं देखील राणा म्हणाल्या.

हे वाचलंत का :

  1. ...तर दहा मिनिटं नवनीत राणा एकटी नाचेल; इम्तियाज जलील यांची जहरी टीका - lok sabha election
  2. 26/11 हल्ला प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सत्य लपवलं; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप - 2611 terrorist attack on Mumbai
  3. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 11, 2024, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.