अमरावती Lok Sabha Election 2024 : "देशात असणारा काळा पैसा हा देशातील गरिबांना वाटण्यात येईल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयाचं मी स्वागत करते," असं मत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. मतदानाचा हक्क बजावल्यावर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला.
![Lok Sabha Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-04-2024/mh-amr-03-navneet-rana-cast-vote-vis-7205575_26042024114801_2604f_1714112281_683.jpg)
सकाळी 11 वाजता नवनीत राणांनी केलं मतदान : नवनीत राणा या शंकर नगर येथील आपल्या निवासस्थानावरुन पती आमदार रवी राणा यांच्यासह दुचाकीवर बसून लक्ष्मीनारायण नगर परिसरातील श्रीराम प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर पोहोचल्या. या ठिकाणी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना अभिवादन करून त्यांनी मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यावर देखील त्यांनी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मतदारांसोबत सेल्फी देखील काढला.
![Lok Sabha Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-04-2024/mh-amr-03-navneet-rana-cast-vote-vis-7205575_26042024114801_2604f_1714112281_490.jpg)
ईव्हीएम योग्यच म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत : ईव्हीएमद्वारे देशात निवडणूक प्रक्रिया राबविणं हे योग्य असून ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा नसल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करते," असं देखील नवनीत राणा म्हणाल्या.
मतदारांच्या अडचणी घेतल्या जाणून : मतदान केंद्रावर पोहोचलेल्या अनेक मतदारांचं नाव मतदार यादीत नसल्यामुळे काही मतदार काहीसे चिडले होते. त्यांनी या संदर्भात नवनीत राणा यांना मतदान केंद्राबाहेर तक्रार केली. मतदारांच्या अडचणी समजून घेतल्यावर नवनीत राणा यांनी थेट जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, या संदर्भात नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं विनंती केली.
हेही वाचा :