ETV Bharat / state

मोबाईलसह पैसे चोरण्याच्या नादात एकाची हत्या, पोलिसांनी 'असा' केला तपास - Navi Mumbai Crime - NAVI MUMBAI CRIME

Navi Mumbai Crime : पैसे, मोबाईल चोरीच्या नादात एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी कसा तपास केला, याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Navi Mumbai Crime
समीर अमरजीत शेख (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 10:56 PM IST

नवी मुंबई Navi Mumbai Crime : मोबाईल, पैसे चोरण्याच्या नादात एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या अज्ञात आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई परिमंडळ 1 मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी माहिती दिली. आरोपींनं मयताचा धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. समीर अमरजीत शेख वय (23 वर्षे) रा. तळवली असं आरोपीचे नाव आहेत. त्यानं सुशीलकुमार रामजीवन बिंदची (25) हत्या केल्याचं उघड झालं आहे.

दीपक साकोरे यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)

काय आहे प्रकरण : रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे बेलापूर रोडवरील फूटपाथवर पहाटेच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पदरीत्या झोपलेली आढळून आली होती. संबंधित डिलिव्हरी बॉयनं पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. अधिक तपास केला असता, सुशीलकुमार रामजीवन बिंद (25) असं संबंधित मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुशील कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज तालुक्यातील सुजा गावचा रहिवासी होता. 1 ऑगस्ट रोजी तो मुंबईतील मुलुंड येथे आपल्या मामाच्या घरी आला होता. 4 ऑगस्ट रोजी तो मोबाईल दुरुस्त करण्यासाठी कळव्याला जात असल्याचं सांगून तो घरातून निघून गेला होता. मात्र 5 तारखेला रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे-बेलापूर रस्त्यावरील पदपथावर सुशीलकुमारचा मृतदेह आढळून आला. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

खिशातील चिठ्ठीवरून पटली मृताची ओळख : घटनास्थळी मृत व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी संबंधित घटनेचा तपासणीसाठी कोपरखैरणे ते घणसोली रस्त्यालगतच्या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. या तपासात मृत सुशील कुमार हा ठाणे बेलापूर रस्त्यावरून पायी जात असल्याचं निष्पन्न झालं.

गुन्हा लुटण्याच्या उद्देशानं कबूल- गुन्हे शाखा कक्ष 1 चे पोलीस अधिकाऱ्यांनी चार पथकं तयार करून ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे घणसोली परिसरात 15 दिवसांत 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं. त्यावेळी संशयित मोटारसायकलची झडती घेतल्यानंतर संबंधित मोटारसायकल समीर अमरजीत शेख (23 वर्षे) रा. तळवली गाव घणसोली यांची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानं हा गुन्हा लुटण्याच्या उद्देशानं केल्याचे कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी समीर शेख याला अटक केली. आरोपी समीर शेख हा व्यसनी असल्याचं निष्पन्न झालंय.

'हे' वाचलंत का :

  1. बदलापूर घटनेवरून राजकारण तापलं; विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप - Badlapur School Girls Case
  2. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
  3. भय इथलं संपलं नाही! मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत - Girl Sexually Abuse Kandivali

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.